Share

औरंगाबादेत पालकमंत्र्यांच्या हस्ते १०३ शिक्षकांचा गौरव; आ. दानवेंचा विशेष पुढाकार..!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: समाजात शिक्षकांचे स्थान उच्चतम असून हातात घेतलेले कार्य प्रामाणिकपणे पार पाडत असतात. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या मुलांना शिकवण्याचे, घडवण्याचे ध्येय मनाशी बाळगून समाजाप्रती आपले हे काम अभिमानास्पद आहे. उत्तम कार्य करणाऱ्या शिक्षकांचा हा बहुमान आहे. पालकमंत्री सुभाष देसाई(Subhash desai) बोलत होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्या वतीने १०३ शिक्षकांचा सोमवारी (दि.३) सुभाष देसाई यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी बोलताना पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा वसा पुढे नेऊन आपल्या कामाचा ठसा उमटवला त्यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजकांनी शिक्षकांचा गौरव हा कार्यक्रम घेतला हे कार्य अभिनंदनीय आहे. शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या संयोजनाने तापडिया नाट्यमंदिर कोरोना नियमांचे पालन करून हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला.

यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष तथा अनुसूचित जाती जमाती आयोग महामंडळाचे राज्य अध्यक्ष ज.मो. अभ्यंकर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते शिक्षकांना सन्मान पत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय ग्लोबल टीचर्स अवॉर्ड विजेते प्राध्यापक रणजीत दीसले यांचे आभासी मार्गदर्शन ही झाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!