Share

एक शून्य शून्य वरून पोलिसांशी संपर्क तुटला; पोलिसांशी संपर्कासाठी येणार नवीन क्रमांक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: सामान्यांना विविध संकट समयी प्रशासनाकडून मदत मिळवायची असल्यास त्यासाठी देशभर विविध हेल्पलाईन क्रमांक आहेत. त्यामुळे अनेक आपत्कालीन स्थितीमध्ये तात्काळ मदत देत सामान्यांच्या समस्या सोडवल्या जातात. यामध्ये राज्यात पोलिसांसाठी संपर्क करायचा झाल्यास १०० तसेच अग्निशमन १०१ आणि महिला हेल्पलाईन १०९० या क्रमांकावर संपर्क साधावा लागतो. मात्र गेल्या वर्षी उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये २६ ऑक्टोबरला उत्तर प्रदेश सरकारने १०० क्रमांक बंद करून ११२ ही हेल्पलाइन स्वीकारली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्यात देखील पोलिसांकडून ११२ या हेल्पलाइन नंबरचा अवलंब करण्यात येणार आहे.

दिल्लीत झालेल्या निर्भया प्रकरणानंतर केंद्र पातळीवर एकच हेल्पलाईन क्रमांक असावा असा सूर सर्व स्तरातून उमटला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार आपत्कालीन प्रतिसाद सहाय्यक प्रणाली (ईआरएसएस) निर्मितीचा निर्णय घेण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व भागांचे जिओ टॅकिंग केले जात आहे. त्याचबरोबर सेंट्रलाइज कंट्रोल रूमला फोन आल्यावर कशा प्रकारे प्रतिसाद द्यायचा, कंट्रोल रूमला फोन आल्यावर काय प्रक्रिया राबवायची याबाबत प्रशिक्षित प्रणाली निश्चित करण्यात आले आहे. या सर्व गोष्टींची पूर्तता झाल्यावर राज्यातील १०० क्रमांक बंद केला जाणार आहे.

एकाच वेळी सर्व प्रकारची मदत पीडितांना मिळावी यासाठी केंद्र पातळीवर हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ३१ डिसेंबरपर्यंत राज्यात ११२ ही हेल्पलाइन सुरू व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर सेंट्रलाइज कंट्रोल रूम मध्ये एकाच वेळी किमान ७० ते ८० प्रशिक्षित लोक काम करणार आहेत त्यामुळे नागरिकांना कमीत कमी वेळात सर्व प्रकारची मदत पोहोचवली जाईल ११२ क्रमांक सुरू झाल्यावर पुढील काही दिवसांसाठी १०० क्रमांक देखील सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती, अप्पर पोलीस महासंचालक प्रधान मॉडेल ऑफिस ऑफिसर सेंट्रलाइज हेल्पलाइन सिस्टीम एस. जगन्नाथन यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!