मुंबई : कोरोनाचा विषाणू हा सध्या अवघ्या जगाची डोकेदुखी ठरला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच संभाव्य हानी टाळण्यासाठी जगभरात सध्या मोठ्याप्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे जगभरातल्या सर्वच देशांनी आपापल्या देशातील कोरोना लसीकरणाची गती वाढवावी अन्यथा डेल्टा व्हेरिएंट अधिक जीवघेणा ठरु शकतो असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.
दरम्यान सध्या महाराष्ट्रामध्ये डेल्टा प्लसच्या रुग्णांची वाढ होत आहे. राज्यात डेल्टा प्लस बाधित रुग्णांची संख्या 66 वर गेली असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रच्य चिंतेमध्ये अधिकची भर पडली आहे. डेल्टा प्लस बाधित रुग्णांची संख्या 66 वर गेली असून आतापर्यंत 5 डेल्टा प्लस बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
दरम्यान बाधित एकूण 66 रुग्णांपैकी 10 जणांनी कोविड प्रतिबंधक दोन्ही डोस घेतले असून 8 जणांनी एक डोस घेतल्याची देखील माहिती टोपे यांनी दिली आहे. आजवर राज्यात डेल्टा प्लस बाधित 5 जणांचा मृत्यू झाला असून त्यांना इतर आजार असल्याचं देखील टोपे यांनी सांगितलं आहे. दरम्यान आता नाशिक, मुंबई, ठाण्यापाठोपाठ आता पुण्यातही डेल्टा प्लस विषाणूचा शिरकाव झाला आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात डेल्टा प्लस संसर्गाचे रुग्ण आढळल्यानंतर आता शहरातही एक रुग्ण आढळला आहे. हडपसर मुंढवा परिसरात हा डेल्टा प्लसचा रुग्ण आढळला असून पालिकेनं त्याला होम आयसोलेशनमध्येच ठेवलं आहे. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या अन्य मित्र आणि नातेवाईकाचं शोध घेतला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मान्सून पुन्हा सक्रिय ; राज्यातील ‘या’ भागात कोसळणार, येलो अलर्ट जारी
- ‘प्रकाश आंबेडकर सोबत आले, तरच रिपब्लिकन ऐक्य शक्य’, रामदास आठवलेंची भूमिका
- पुण्यात ‘या’ पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
- संजय राठोडांच्या अडचणीत होणार वाढ; ‘त्या’ महिलेने गाठले पोलीस ठाणे
- तालिबानी हिंसाचाराने गाठला कळस ; राष्ट्रपती राजीनामा देऊन कुटुंबासोबत देश सोडण्याच्या तयारीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

