सातारा : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारची चिंता वाढली आहे. रुग्णसंख्या कमी करण्यासाठी काय उपाययोजना आखायच्या यावर शासनाचा विचार विनीमय चालू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊन लावण्याबाबत संकेत दिले आहेत. राज्यातील रुग्णसंख्या अशीच वाढली तर कठोर निर्णय घ्यावा लागेल, असे अजित पवार म्हणाले आहेत.
अजित पवार सातारा जिल्हा दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘करोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल. या संदर्भात मुख्यमंत्री जो निर्णय घेतील, त्याची अंमलबजावणी सर्व भागांत केली जाईल,’ असं अजित पवार म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी लॉकडाउन केलं आहे. देशातील अनेक राज्यांत रात्रीच्या वेळेस लॉकडाउन करण्यात आलं आहे. कारण, जेवताना, चहापाण्याच्या वेळेस मास्क काढतो. एकमेकांच्या समोर येतो तेव्हा करोनाचा संसर्ग झपाट्यानं होतो. त्यामुळं या गोष्टी टाळणं नितांत गरजेचं आहे,’ असं अजित पवार म्हणाले आहेत.
करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी माझे कार्यक्रम सुद्धा मी वेळे अगोदरच घेतो. त्यामुळं गर्दी कमी होते आणि मीच जर नियम मोडले तर बाकीच्यांना नियम काय सांगणार? पाच दिवसांच्या अधिवेशनात १० मंत्री आणि २० आमदार पॉझिटिव्ह झाले. काही दिवस अजून अधिवेशन चालू ठेवलं असतं तर अर्ध्यापेक्षा जास्त मंत्रिमंडळ आणि आमदार करोना पाॅझिटिव्ह झाले असते, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘एकमेकाला ओरबाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजाला सावित्रीबाईंनी सत्कार्याचा आदर्श घालून दिला’
- युगायुगांच्या बेड्या तोडणाऱ्या सावित्रीबाई रणरागिणी होत्या- अमोल कोल्हे
- ‘सावित्रीबाईंनी जे कार्य केले,त्याचे मोजमाप कोणत्याच परिमाणात करता येणं अशक्य’
- ‘सुप्रिया सुळे थापा मारताय की हे सगळेच लोकप्रतिनिधी…’, भातखळकरांचा हल्लाबोल
- ‘अंधेर नगरी घरी बसला राजा’, म्हाडा आणि एमपीएससीच्या परीक्षेवरून भातखळकरांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

