🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीत लातूर मधून कॉंग्रेस उमेदवार अमित देशमुख यांना शह देण्यासाठी भाजपने काँग्रेस नेते आणि माजी केंद्रिय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांच्या सुनेला मैदानात उतरवण्याची तयारी केली होती. मात्र भाजपचा हा डाव पूर्णपणे फसला असल्याचं समोर आलं आहे.
खुद्द चाकूरकर यांनीचं भाजपचा हा डाव उलथवून लावला आहे. मी किंवा माझे कुटुंबिय मरेपर्यंत काँग्रेस सोडणार नाही, असे म्हणत चाकूरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेसची विचारधारा हाच आपला श्वास आहे. त्यामुळे मी किंवा माझे कुटुंबिय कधीच पक्ष सोडणार नाही, असं चाकुरकर म्हणाले. गेले अनेक दिवस देशमुखांना कोंडीत पकडण्यासाठी भाजपने चाकूरकर यांच्याशी संपर्क वाढवला होता. तर अमित देशमुख यांना शह देण्यासाठी चाकूरकर यांच्या सुनेला विरोधात उतरवण्याचा ही डाव भाजपने आखला होता.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीपासून भाजपने काँग्रेसची वारंवार कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. त्याचाच भाग म्हणून लातूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवारासमोर काँग्रेस पक्षातलाच कोणीतरी फोडायचा आणि त्याला भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवायला लावायची, अशी रणनिती भाजपने आखली होती. मात्र सध्या तरी ती रणनिती फेल ठरल्याची चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1179716243122618368?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1179716118291701761?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1179714459553546240?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

