Share

वंचित लोक, अनाथ बालकांसाठी सुविधा मजबूत करा; केंद्राचे राज्यांना निर्देश

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनाथ झालेल्या बालकांबरोबर वंचित लोकांसाठीच्या सुविधा आणखी मजबूत करण्याचे निर्देश केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत. महामारीच्या काळात मानवी तस्करीला आळा घालण्याच्या उद्देशाने केंद्राने सुविधा वाढविण्यावर भर देण्यास सांगितले आहे.

केंद्र सरकारने कोरोना संकटात वंचित वर्गाच्या सुरक्षेवर लक्ष दिले जात असल्याचे म्हटले आहे. महिला, मुले, वरिष्ठ नागरिक, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीविरोधातील गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि त्याविरोधात लढा देण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. तसेच मानवी तस्करीला आळा घालण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा मजबूत करण्यावर भर दिला जात आहे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे परिणाम लक्षात घेत मंत्रालयाने राज्य व केंद्रशासित प्रदेशांना वंचित वर्ग, खासकरून कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत. अनाथ मुले, वैद्यकीय मदतीची आवश्यकता असलेले वरिष्ठ नागरिक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या लोकांसाठी सद्य:स्थितीत असलेल्या सुविधांचा आढावा घेवून त्या आणखी मजबूत करा, असे मंत्रालयाने म्हटले आहे. शिवाय जिल्हापातळीवर पोलीस ठाण्यात महिला मदत कक्ष आणि मानव तस्करीविरोधी युनिटचे प्रभावी संचालन करण्याचे निर्देश केंद्राने दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!