Share

औरंगाबाद-जळगाव रस्त्यावर अपघात, १ महिला ठार तर ४ जण जखमी

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : जळगाव राष्ट्रीय महामार्गावर आळंद (ता.फुलंब्री) येथील ( गणपती माथ्या पुढे) औरंगाबाद येथून जळगाव कडे जाणाऱ्या स्विफ्ट कारच्या चालकाचा ताबा सुटल्याने कार पुलाच्या कठाड्याला धडकून पुलाखाली कोसळली. या अपघातात १ महिला ठार झाली तर ४ जण जखमी झाले आहेत.

कोथरूड (पुणे) येथून कार क्र (एम. एच.१२ एफ. यु. ९१२६) जळगावकडे जात असतांना दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये प्राची सुधीर कुलकर्णी (वय-४५ रा कोथरुड, पुणे) या अपघातात गंभीर जखमी झाल्या तर त्यांचे पती चालक सुधीर कुलकर्णी यांच्यासह एक महिला, पुरुष व एक १२ वर्षाची मुलगी जखमी झाले . यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक ( नागरिक हक्क पथक औरंगाबाद ग्रामीण) नामदेव चव्हाण, जमादार एस.बी. देशमुख, तातेराव हाव्हळे हे तपास कामी कायगाव कडे जात होते.

त्यांनी अपघातातील जखमीना रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी प्राची सुधीर कुलकर्णी यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. यात ४ जण जखमी आहे. या अपघाताची वडोद बाजार पोलीसात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास स. पो. नि. आरती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार दत्ता मोरे पुढील तपास करत आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!