🕒 1 min read
मुंबई : काँग्रेसचे नेते भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यात काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचे ही चर्चा रंगू लागले आहेत. मात्र दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात बोलून न दिल्याने अजित पवार नाराज असल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादच्या सभेत केला. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना नाराजीची चर्चा असणारे अजित पवार भाजपच्या संपर्कात आहेत का? असा सवाल विचारण्यात आला होता. यावर बावनकुळे यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रीयाः
अजित पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने काय करावं, पक्षात किती वाद करावेत, घरात वाद करावेत किंवा रस्त्यावर वाद करावेत, हा त्यांचा प्रश्न आहे, माझा नाही, असं बावनकुळे म्हणाले. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव गटाने असं म्हटलं की, आम्हाला आमच्या पक्षात राहण्यास राहण्यात रस नाही, तर आम्ही चांगले लोकांना नक्की पक्षात घेऊ, मात्र आम्ही त्यांना फोन करणार नाही, पक्षात या असं कोणी म्हणणार नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
ज्यांना भाजपमध्ये यायचं आहे, त्यांना आम्ही भाजपमध्ये प्रवेश देऊः
यादरम्यान, ज्यांना भाजपमध्ये यायचं आहे, त्यांना आम्ही भाजपमध्ये प्रवेश देऊ, मोठे मासे गळायला लागणार का? यावर तुम्हाला अशा बातम्या येतील की तुम्ही डोक्यावर हात ठेवून म्हणाल हे कसं झालं जसं सरकारच्या बाबतीत झालं रात्रीतून मुख्यमंत्र्यांची खुर्ची गेली तसेच अनेक पक्षप्रवेश भाजपात होतील, असे देखील बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
ईडी अथवा आयकर विभागाची कारवाई उगाच कुणावरही होत नाहीः
दरम्यान, ईडी अथवा आयकर विभागाची कारवाई उगाच कुणावरही होत नाही, विरोधकांनी काहीच केलं नाही, एकदम प्रामाणिकपणे आयुष्य घालवलं आहे तर ईडी असो अथवा आयकर विभाग कोणी कितीही घरी आलं तरी काय फरक पडतो? त्यांनी काहीतरी केलं असेल म्हणूनच तुम्ही ईडीला घाबरत आहात, असा टोला देखील बावनकुळे यांनी यावेळी लागला आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Chandrakant Khaire | “मी तुम्हाला चांगली खुर्ची देतो, उद्धवजी…”, चंद्रकांत खैरेंचं शहाजी बापू पाटलांना प्रत्युत्तर
- आत्महत्या रोखण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी…
- BIG NEWS | ठाणे तालुक्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश
- Kishori Pednekar | “जिने घाणेरड्या पिक्चरमध्ये काम केलं…” ; किशोरी पेडणेकरांची नवनीत राणांवर टीका
- Sada Sarvankar | खरचं शिंदे गटातील आमदाराने गोळी झाडली, काय आहे प्रकरण? ठाकरे vs शिंदे वाद पेटणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
