मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठण येथे सभा झाली. या सभेपूर्वी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून संदीपान भुमरे यांनी या सभेसाठी गर्दी पैसे देऊन जमवली असल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला होता. यावरूनच सभेमध्ये शहाजी बापू पाटील यांनी चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यावर टीकेचा बाण सोडला होता. आता याला चंद्रकांत खैरे यांनी पुन्हा एकदा प्रत्युत्तर दिलं आहे.
आम्ही टीव्ही पाहत होतो, ती गर्दी पैठण बाहेरची जास्त होती, शहाजी पाटील म्हणाले ही झाडी, हे फलानं, असं हे फक्त काही दिवस चालणार? काम तर करावी लागतील की नाही? मी शहाजी बापू पाटलांना सांगतो तुम्ही काही मतांनीच निवडून आले होते, उद्धवजींनी तुम्हाला मोठं स्थान दिलं होतं, असं म्हणत उद्धवजींच्या बाबतीत तुमचं मत चांगला आहे, मग चला मातोश्रीवर जाऊयात असं मी म्हणतो असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.
शहाजीबापू पाटील यांनी सभेत कोपऱ्यात दोन खुर्च्या टाकल्या पाहिजे होत्या, म्हणजे त्यांनाही गर्दी कळाली असती असा टोला चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यावर लगावला होता. यावर मी शहाजी बापू पाटलांना सांगतो तुम्ही आमच्यासाठी दोन खुर्च्या ठेवल्या होत्या त्यापेक्षा मी तुम्हाला चांगली खुर्ची देतो उद्धवजी, मातोश्रीकडे जाऊन देतो तुम्ही तिकडे या, असा टोला चंद्रकांत खैरे यांनी लगावला आहे.
दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी संदिपान भुमरे यांना पैठणचा बोक्या खोक्यांना विकला जाणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. यावर देखील चंद्रकांत खैरे यांनी पुन्हा एकदा वक्तव्य केलं, तर मला अनेक फोन आली असून पैठणचा बोका कोण असं विचारलं जात असल्याचं खैरे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्याः
- BIG NEWS | ठाणे तालुक्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश
- Kishori Pednekar | “जिने घाणेरड्या पिक्चरमध्ये काम केलं…” ; किशोरी पेडणेकरांची नवनीत राणांवर टीका
- Sada Sarvankar | खरचं शिंदे गटातील आमदाराने गोळी झाडली, काय आहे प्रकरण? ठाकरे vs शिंदे वाद पेटणार?
- Apple चे अपडेट WatchOS 9 बाजारात, वैशिष्टे जाणून तुम्हीही थक्क व्हाल!
- Ajit Pawar | “कुणाच्यात हिंमत असेल तर नरेंद्र मोदींचा फोटो न लावता निवडून येऊन दाखवा”, अजित पवार


