औरंगाबाद : जिल्ह्यात बर्ड फ्लू आजाराची भीती दूर करण्यासाठी जिल्हा परिषदच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने बुधवार, ३ रोजी चिकन महोत्सव आयोजित करण्यात आला होता. बर्ड फ्लूची नागरिकांमध्ये दहशत आहे. आजाराच्या भीतीमुळे नागरिक चिकन खाण्यापासून प्रवृत्त होत आहेत.
याचा फटका चिकन व्यावसायिकांना तसेच पोल्ट्री व्यावसायिकांना होत आहे. या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने बुधवारी चिकन महोत्सव घेण्यात आला. या चिकन महोत्सवात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले यांच्यासह अधिकाऱ्यांनी चक्क व्यासपीठावरच चिकन बिर्याणीचा आस्वाद घेत नागरिकांना बर्ड फ्लूची भीती न बाळगता चिकन खाण्याचे आवाहन केले आहे.
राज्यात बर्ड फ्लू आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. परंतु औरंगाबाद जिल्ह्यात बर्ड फ्लूचा एकही केस आढळला नाही. मात्र, बर्ड फ्लू आजाराच्या विविध अफवामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही भीती घालवण्यासाठी जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन विभागाच्या डॉ. सुरेख माने यांनी चिकन महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन सभापती एल. जी. गायकवाड यांच्यासह जिल्हा परिषदेच्या अधिकारी यांनी चिकन बिर्याणी खाऊन बर्ड फ्लूची भीती सुरू करण्याचा प्रयत्न केला.
महत्वाच्या बातम्या
- रिहानाविरुद्ध आता बॉलीवूडचा खिलाडी, सिंघम मैदानात, गैरसमज पसरवणाऱ्यांनाही सुनावले खडे बोल
- रिहानाच्या ट्विटवर राहुल गांधींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, दिल्लीतील फौजफाट्यावरून मोदींवर टीका
- प्यायचे होते पाणी, पण चुकून प्यायले सॅनिटायझर; BMCचे सहआयुक्त रमेश पवारांकडून घडली चूक
-
शेतीतलं ना राहुल गांधींना काही कळतं, ना रिहानाला – संबित पात्रा
- शरजील उस्मानीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी चंद्रकांत पाटलांचे थेट योगींना पत्र

