अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरचे जिल्हा परिषद सदस्य शरद नवले व बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांच्यात काल वादावादी झाली. नंतर दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत शहर पोलिसांनी चौघांविरुद्ध कारवाई केली आहे.
स्थानिक राजकारणात कट्टर विरोधक असलेल्या जिल्हा परिषद सदस्य शरद नवले आणि बाजार समिती संचालक सुधीर नवले हे चुलते-पुतणे असून, त्यांच्यातील राजकीय वाद मोठा आहे. दोघांनी एकमेकांविरुद्ध जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली होती.
राज्यातील आणखी एका मंत्र्याला कोरोना
दोघांमध्ये स्थानिक राजकारणात नेहमी आरोप-प्रत्यारोप होत असतात. ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्ती झाली असून, विकास कामांची बिले काढण्यावरून दोन दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. काल सकाळी सुधीर नवले ग्रामपंचायतीमध्ये बसले असता तेथे शरद नवले आले त्यांच्यामध्ये तेथे शाब्दिक वाद झाले.
प्रश्नोत्तराच्या तासासाठी विरोधक आक्रमक तर सरकार निर्णयावर ठाम
घडलेला प्रकार समजताच, सुधीर नवले यांचे समर्थक शरद नवले यांच्या भावाच्या दुकानासमोर आले. त्यावेळी तेथे शरद नवले यांचेही समर्थक जमले. यावेळी दोन्ही गटाच्या समर्थकांमध्ये मारामारी झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर वादावर पडदा पडला. ह्या मारामारीमध्ये चौघेजण जखमी झाले आहेत. शरद नवले, नितीन नवले, सुधीर नवले, अनिल नवले यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली आहे.
माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काही बरळलेलं सहन करणार नाही ; मनसे नेते अमेय खोपकर यांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

