मुंबई: राज्यात कोरोना रुग्णांचे आकडे दररोज वाढतच आहे. कोरोनामुळे अशी भीषण परिस्थिती होत असताना महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांना कोरोना झाला, त्यातून ते बरेसुद्धा झाले. आता महाराष्ट्रातील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे.काँग्रेस नेते आणि महाविकासआघाडी सरकारमधील दुग्धव्यवसाय मंत्री सुनिल केदार यांना कोरोनाची बाधा झाली आहे. लवकरात लवकर ते कोरोनातून मुक्त व्हावेत म्हणून कार्यकर्त्यांकडून प्रार्थना केली जात आहे. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंत्र्यांना कोरोनाची लागण होण्याची ही काही पहिली घटना नाही. याआधीही अनेक मंत्री कोरोनातून मुक्त झाले आहेत.
याआधी, महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड,सामाजिक न्याय व विषेश सहाय्य मंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, तसेच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली होती. मंत्रालय मंत्र्यांना कोरोना होऊ नये यासाठी विषेश काळजी घेतली जात आहे. मंत्र्यांना मोजक्याच लोकांन भेटता यावं यासाठीही प्रयत्न करत जात आहेत. विधानसभेचं कामकाजही पुर्ण क्षमतेनं सुरू झालेलं नाही.
प्रश्नोत्तराच्या तासासाठी विरोधक आक्रमक तर सरकार निर्णयावर ठाम
कोरोना काळात लोकांना आलेल्या अडचणी लक्षात घेता आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणात सुट दिली आहे. एसटी बस,रेलवे, दुकाने, मॉल, खासगी बस सुरू करण्यात आल्या आहेत. पण सध्या राज्यातील मंदीर उघडावे म्हणून सरकारला विरोधी पक्ष धारेवर धरत आहे.
माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काही बरळलेलं सहन करणार नाही ; मनसे नेते अमेय खोपकर यांचा इशारा


