Share

उत्पादन खर्च शून्य म्हणूनच ‘झिरो बजेट’ शेती आधुनिक तंत्र!

Published On: 

औरंगाबाद : झिरो बजेट विषमुक्त शेतीमुळे जमिनीचा पोत सुधारला तसेच याशिवाय खर्च कमी झाल्यानं त्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. उत्पादन खर्च शून्य म्हणूनच त्याला ‘झिरो बजेट’ शेती म्हणता येईल. हे एक तंत्र आहे. ग्रामपंचायत नांदलगाव व युवांश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिनानिमित्त ‘झिरो बजेट शेती कार्यशाळा’ अशोक पठाडे व स्वप्नील पठाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदलगावात रविवारी पार पडली. यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी पठाडे यांनी सांगितले, झिरो बजेट विषमुक्त शेतीमुळे जमिनीचा पोत सुधारला तसेच याशिवाय खर्च कमी झाल्यानं त्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. उत्पादन खर्च शून्य म्हणूनच त्याला ‘झिरो बजेट’ शेती म्हणता येईल. हे एक तंत्र आहे,’ असं पठाडे सांगतात. त्यांचा दावा आहे की, अशा पद्धतीची शेती सध्या भारतात ४० लाख शेतकरी करतात आणि त्यापैकी कोणीही आत्महत्या केलेली नाही. तसे यासाठी मजुरीशिवाय कोणताही इतर खर्च येत नाही. नैसर्गिक शेतीसाठी स्वत: जीवामृत, निमार्क, दशपर्णी अर्क, निमास्त्र, ब्रम्हास्त्र आणि अग्नीअस्त्र, अशी खतं तसेच मिश्रण तयार करतो.

पिकांवर मावा, तुडतुडे, फुलकिडे, रसशोषक किडे यासारखे रोग येण्यापूर्वीच प्रतिबंधक म्हणून ही रसायनविरहित कीटकनाशके आम्ही फवारतो. शिवाय हे फवारताना काहीच अपाय होत नाही, त्यामुळे मजुरांच्या जीवाला कोणताही धोका नाही. हे गेली अकरा वर्षं माझ्या शेतात सिद्ध झाले आहे, असे पठाडे यांनी सांगितले. त्यामुळे कमीत कमी नैसगिक संसाधन वापरून आणि कमी खर्च करून जास्त उत्पादन घेण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला पाहिजे, असे मत पठाडे यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थितीत शेतकऱ्यांनी विविध प्रश्न विचारून यासंबंधी माहिती घेतली. यावेळी नांदलगावचे सरपंच चंद्रकांत चाबुकस्वार, उपसरपंच किशोर शिंदे, साईनाथ गायके आदी सदस्य उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!