टीम महाराष्ट्र देशा: गुजरात विधानसभांच्या निवडणुकांत भाजपने केंद्रीय मंत्र्यांसह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, खासदार, आमदार हे स्टार प्रचारक म्हणून उतरवले आहेत. याचवरून भाजपवर निशाना साधत ‘ केंद्रीय मंत्रीमंडळ, सर्व मुख्यमंत्री, शेकडो MP आणि MLA, कित्येक इतर राज्यांचे पदाधिकारी, सर्वांनीच स्वतःला प्रचारात झोकून घेतले आहे, मग देश चालवतोय तरी कोण?’ म्हणत युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे.
केंद्रीय मंत्रीमंडळ, सर्व मुख्यमंत्री, शेकडो MP आणि MLA, कित्येक इतर राज्यांचे पदाधिकारी, सर्वांनीच स्वतःला प्रचारात झोकून घेतले आहे, पण प्रश्न एवढाच आहे, देश चालवतोय तरी कोण? (१/n)
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 5, 2017
भाजपचे सध्या ‘ नव नेशन वन इलेक्शन’ हा अजेंडा घेतला आहे. यामध्ये केंद्र आणि अनेक राज्यांच्या निवडणुका एकत्र घेण्याचा प्रयत्न आहे. तसेच गुजरात निवडणुकांचा उल्लेख करत भाजपने संसदेचा मान राखला नसल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे.
असं वाटतंय “One Nation, One Election” Policy मध्ये केंद्र आणि सर्व इतर राज्यांच्या एकत्र निवडणुका घेतील, गुजरात च्या वेगळ्या. ह्यांनी तर पार्लिमेंटचा ही मान राखला नाही, असं सर्वचं म्हणतायेत.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 5, 2017
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

