रायपुर : येथे सुर असलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये शनिवारी झालेल्या सामन्यात इंडीया लेजेंड्स संघाने दक्षिण अफ्रिका लेजेंड्स संघाचा ५६ धावांनी पराभव केला आहे. सहा सामन्यातील हा भारताचा पाचवा विजय ठरला आहे. या सामन्यात भारतीय संघाने २०० चा आकडा पार करुन या स्पर्धेत २०० धावसंख्या पार करणारा पहिला संघ होण्याचा मान पटकावला आहे.
दक्षिण अफ्रिका संघाने नाणेफेक जींकुन आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्याच षटकात भारताचा धडाकेबाज फलंदाज सेहवाघ तंबुत परतला. मात्र यांनतर कर्णधार सचिन तेंडुलकरने जोरदार फटकेबाजी करत संघाचा डाव सावरला. सचिनची ही खेळी पाहुन त्याचे चाहते खुश झाले. त्याला बद्रीनाथची चांगली साथ मिळाली. तेराव्या षटकांत तंबुत परतल्यानंतर डेथ ओव्हरमध्ये युवराजने झंझावाती फलंदाजी करत सलग चार षटकार लावले आणि अर्धशतक पुर्ण केले.
सचिन आणि युवराजच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने दक्षिण अफ्रिकेसमोर २०५ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात दक्षिण अफ्रिकेच्या सलामीच्या फलंदाजानी चांगला खेळ दाखवत पहिल्या विकेटसाठी ८७ धावा जोडल्या मात्र सलामीची जोडी माघारी परतल्यानंतर भारतीय गोलदांजानी दक्षिण अफ्रिकेला १४८ धावांत रोखले. युवराज सिंग हा सामनाविराचा मानकरी ठरला.
महत्वाच्या बातम्या
- टायगर अभी जिंदा हैं ; सिक्सरकिंग युवराजने केली षटकारांची बरसात
- सचिन वाझेंच्या अटकेनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- ‘माझा अभ्यास दांडगा, मला वनमंत्री करा’, रिक्त जागेसाठी शिवसेनेत जोरदार लॉबिंग सुरु
- ‘सचिन वाझेंची ताबडतोब नार्को टेस्ट करा; होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी’
- जॅकलिनचा बोल्ड फोटोशूट चाहते म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

