Share

‘माझा अभ्यास दांडगा, मला वनमंत्री करा’, रिक्त जागेसाठी शिवसेनेत जोरदार लॉबिंग सुरु

Published On: 

🕒 1 min read

यवतमाळ : राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनामामुळे रिक्त जागेसाठी पक्षात चढाओढ लागली आहे. रिक्त झालेल्या पदावर कुणाची वर्णी लागणार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या पदावर आता काही जणांनी आपला दावा देखील केला आहे. यात संजय राठोड यांच्याच मतदारसंघातील दारव्हा नगरपरिषदेमधील शिवसेना नगरसेवकाने मंत्रीपदावर दावा केला आहे. या नगरसेवकाने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. त्यात ‘माझा अभ्यास दांडगा, मला वनमंत्री करा’ अशी मागणी केली आहे. रवी तरटे असे या नगरसेवकाचे नाव आहे. तरटे हे दारव्हा येथील प्रभाग 4 मधून शिवसेनेचे नगरसेवक आहेत.

तरटे यांच्या या अजब पत्राची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. रवी तरटे यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, ‘5 वर्षांपासून शिवसेना निष्ठावंत म्हणून काम केले आहे. समाजकारणासह राजकारण या विषयावर चांगला दांडगा अभ्यास आहे, इतर पक्षातील नेते या पदासाठी चढाओढ करत असून माझी शिवसैनिक म्हणून या पदावर निवड करावी अशी माझी मागणी आहे असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. माझी मंत्रीमंडळात नियुक्ती केल्यास विदर्भाला मंत्रीमंडळात स्थान मिळेल. विधानसभा मतदारसंघातील असून मला संजय राठोड यांचेही मार्गदर्शन लाभेल. माझ्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन मला विधान परिषदेवर घेऊन वन खात्याचं मंत्रीपद द्यावं, अशी मागणी तरटे यांनी केली आहे.

संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्या रिक्त जागेसाठी शिवसेनेत जोरदार लॉबिंग सुरु झाली आहे. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दोन दिवस अगोदर संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या वनमंत्री पदावर नियुक्ती करावी अशी मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री ठाकरे यांना केली होती. संजय राठोड यांच्या ठिकाणी आता मला वनमंत्री करा अशी त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना केली असून त्यासाठी त्यांनी दोन पत्रंही लिहिली होती. पोहरादेवीचे महंत सुनील महाराजांनी देखील हरिभाऊंना पाठिंबा दिला आहे. ‘हरिभाऊ राठोड यांना मंत्री केल्यास स्वागत करू’, असे महंत सुनील महाराजांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!