चेन्नई : आज आयपीएल 2021 च्या दुसर्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स आमने-सामने येतील. हा सामना रिषभ पंतसाठी खूप खास असणार आहे. कारण प्रथमच रिषभ पंत संघाचं नेतृत्व करणार आहे. श्रेयश अय्यरला दुखापत झाल्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाचा कॅप्टन रिषभ पंत असणार आहे. हा सामना खास असण्याचे कारण म्हणजे पंतची नेमीचं धोनी सोबत तुलना केली जाते. व आज धोनी आणि पंत आमने-सामने खेळणार आहेत म्हणून हा सामना खास ठरणार
आहे.
दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) गेल्या वर्षी झालेल्या अपयशाला विसरून चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) संघ जोरदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. मागील वर्षी युएईमध्ये खेळलेल्या २०२० च्या स्पर्धेत सीएसके प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकला नाही. या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच धोनीची टीम प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकली नाही.
सीएसकेची मजबूत बाजू अशी आहे की त्यात अनुभवी खेळाडू आहेत, जे कठीण परिस्थितीत संघाला जिंकून देण्याची क्षमता ठेवतात. महेंद्रसिंग धोनीचे प्रेरणादायी नेतृत्व हे संघाचे आणखी एक सकारात्मक पैलू आहे.
मात्र, दिल्ली कॅपिटल्स कर्णधार पंतची फलंदाजीसह त्याच्या नेतृत्वाची देखील परीक्षा असेल. अशास्थितीत संघ दमदार प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरेल.
महत्वाच्या बातम्या
- ‘निवडणूक आयोग’, ईव्हीएम मशीन प्रकरणावर राहुल गांधींचे दोन शब्दांत ट्विट
- आरसीबीच्या हुकूमी एक्क्याला कोरोनाची लागण
- कोरोनाशी लढा एकट्या सरकारचा नाही तर सर्व जनतेचा – उद्धव ठाकरे
- ‘कोणत्या दबावाखाली भाजप नेत्याची प्रचारबंदी 48 तासांऐवजी 24 तास केली ?’
- गांधीगिरी! आ.सुरेश धस यांनी केला विनामास्क फिरणाऱ्यांचा सत्कार

