लातूर: जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत आहे, शुक्रवार कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या १४०४ वर पोहोचली. हा आकडा आजवरच्या उच्चांकी आकड्यांपैकी एक असून, कोरोनाचे सावट कोणत्या दिशेला घेऊन जाणार, याचा थांगपत्ता अजून तरी लागलेला नाही. चार जणांचा कोरोना विषाणूची लागण होऊन शुक्रवारी मृत्यू झाला.
मृत्यूच्या आकड्याने देखील आठशेच्या जवळपास मजल मारली असून, एकंदर सर्व परिस्थिती पाहून चिंतेत भर पडली आहे. शुक्रवारी आरटीपीसीआर टेस्टमध्ये ४३२ तर रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये ९७२ असे मिळून १४०४ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले. आज आरटीपीसीआर एकूण टेस्ट २२०० तर रॅपिड अँटिजेन टेस्ट ३६५० झाल्या होत्या.
यातून १४०४ रूग्ण पॉझिटिव्ह आले. लातूर जिल्ह्यात आजवर ४० हजार ५३१ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, यातील ३१ हजार ४१० रूग्ण उपचाराने बरे झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात कोरोना अजून कहर दाखवणार हे नक्की झाले. आरोग्य यंत्रणेवर वाढता ताण लक्षात घेता. नागरिकांनी स्वतःची जबाबदारी घेणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अजितदादांच बोलणं टग्यासारखं पण रडणं बाईसारखं : गोपीचंद पडळकर
- मैदान गाजवलं : आरसीबीच्या हर्षल पटेलने मुंबईच्या निम्म्या संघाला माघारी पाठवलं !
- …तर सिरमच्या लसीचा एक थेंब देखील महाराष्ट्राबाहेर जाऊ देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा
- आयपीएलची टशन : क्रिस लिनच्या धडाकेबाज खेळीने मुंबई इंडियन्सची स्थिती भक्कम !
- मुंबईची परंपरा कायम ; आरसीबी सलामी सामन्यात विजयी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

