Share

युवराज सिंगला दिलासा ‘त्या’ प्रकरणात होणार नाही कोणतीही कारवाई

Published On: 

पुणे : माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग नुकताच मोठ्या अडचणीत सापडला होता. गतवर्षी अप्रत्यक्षपणे दलित समाजातील लोकांवर त्याने अभद्र आणि अपमानास्पद शब्दात टीका केली होती. त्यानंतर सुमारे ८ महिन्यांनंतर या प्रकरणाचा मुद्दा पुढे आल्याने त्याच्यावर एससी-एसटी कायद्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र, आता या प्रकरणातून युवराज बचावला आहे. याप्रकरणी २६ मार्च रोजी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली असून पोलिसांना युवराजविरूद्ध कठोर कारवाई करण्यास बंदी घालण्यात आली आहे. उच्च न्यायालयातील न्यायाधीश अमोल रतन यांनी म्हटले आहे की, या प्रकरणाचा पूर्ण तपास केला जाईल. मात्र पुढील सुनावणी होईपर्यंत युवराजवर कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई केली जाणार नाही. सोबत हांसी पोलिस ठाण्याच्या पोलिस अधीक्षकांकडून याबाबतीत प्रतिज्ञापत्रही सादर करण्यास सांगितले गेले आहे.

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याच्या विरोधात हरयाणा येथे FIR दाखल करण्यात आली होती. २०२०च्या इंस्टाग्राम लाईव्ह सत्रात वर्ल्ड कप विजेत्या युवीनं ‘जातीवाचक टिप्पणी’ केली होती. त्याची ही टिप्पणी दलित समाजाचा अपमान करणारी असल्याचा दावा करण्यात आला आणि त्याबाबत नंतर युवीनं माफीही मागितली होती.

याप्रकरणी हरयाणामधील हिसार येथील वकिलांनी ८ महिन्यांपूर्वी पोलिस स्थानकात युवीविरोधात तक्रार दाखल केली होती. हिसार क्षेत्रात येणाऱ्या हन्सी पोलिस स्थानकात युवीविरोधात IPC कलम (Sections) 153, 153A, 295, 505, उपकलम 3 (1) (r) and 3 (1) (s) of the SC/ST Act नुसार FIR दाखल करण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!