Share

हनुमाननगरात तरुणाची हत्या! जखमी अवस्थेत विव्हळत असताना आरोपींनी केली अंगावर लघुशंका

Published On: 

औरंगाबाद : गारखेडा परिसरातील हुसेन कॉलनीत दोन दिवसांपुर्वी झालेल्या भांडणाचा प्रत्यक्षदर्शी असलेला तरुण दिसताच त्याला फिल्मी स्टाईल मारहाण करुन भरचौकात पाच जणांनी ओढत नेले. हा खळबळजनक प्रकार रविवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास न्यू हनुमाननगरातील गल्ली क्रमांक २ मध्ये घडला. याच पाच जणांनी लोखंडी रॉड, चाकूने भोसकत आणि दगडाने ठेचून त्याची निर्घूण हत्या केली. मारहाण सुरु असताना मदतीसाठी टाहो फोडत असलेल्या या तरुणाच्या तोंडात निर्दयी आरोपींनी माती कोंबली. तसेच आकांताने विव्हळत असलेल्या तरुणाच्या तोंडावर लघुशंका करुन त्याचा व्हिडीओ काढून मारेकरी पसार झाले. हा धक्कादायक प्रकार गुन्हेगारांच्या दहशतीमुळे शेकडो जण फक्त बघ्यांच्या भूमिकेत होते. आकाश रुपचंद राजपूत (२१, रा. अजिंक्यनगर, गारखेडा परिसर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी सोमवारी पहाटे पाच जणांना घरातून अटक केली.

न्यू हनुमाननगरातील मृत आकाश राजपूत हा सागर केशभट या मित्रासोबत फर्निचरची कामे करायचा. दोन दिवसांपुर्वी कुख्यात गुन्हेगार गणेश रविंद्र तनपुरे (१९, रा. गल्ली क्र. २, न्यू हनुमाननगर) याचे आकाशच्या मित्रासोबत हुसेन कॉलनीत भांडण झाले होते. त्यावेळी तेथ सागर देखील उपस्थित होता. त्याचा राग गणेशच्या मनात खदखदत होता. रविवारी रात्री सागर आणि आकाश दिसताच त्याने दोघांना गल्लीत रोखले. तनपुरेची परिसरात दहशत असल्यामुळे त्याला पाहून सागर तेथून पळून गेला. मात्र, तेवढ्यातच आकाशला पकडून ठेवले. आकाशने आरडाओरड सुरु करताच तेथे गणेशचा भाऊ ऋषीकेश रविंद्र तनपुरे (२१), मेव्हणा राहुल युवराज पवार (२४) आणि संदीप त्रिंबक जाधव (४५, मुळ रा. आंबेडकरनगर) हे तेथे आले. त्यांनी आकाशला ओढतच बाजुला असलेल्या त्यांच्या घराच्या दिशेने नेले.

तेथे लोखंडी रॉडने मारहाणीला सुरुवात केली. त्याच्या पायाच्या नळघ्या, दोन्ही गुडघे आणि डोके फोडले. आकाश जमिनीवर कोसळताच गणेशची आई मंगल रविंद्र तनपुरे (४०) हिने त्याला दगडाने मारले. तर गणेश आणि ऋषीकेशने चाकूने भोसकले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आकाश विव्हळत नागरिकांकडे मदतीसाठी याचना करु लागला. पण या गुन्हेगारांनी त्याच्या तोंडात माती कोंबली. त्यामुळे त्याचा आवाजही बाहेर निघत नव्हता. जवळपास दहा मिनिटे हा फिल्मीस्टाईल थरार सुरु होता. मात्र, शेकडो नागरिक केवळ बघ्याच्या भूमिकेत होते.

तनपुरेंच्या नावाने फोडला हंबरडा…..

आकाशला बेदम मारहाण केल्याची माहिती मिळाल्यानंतर पुंडलिकनगर पोलीस ठाण्यातील जमादार बाळाराम चौरे, सुखदेव कावरे आणि पोलीस मित्र अक्षय दाभाडे यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. आकाशला लगेचच पोलीस वाहनातून घाटीत दाखल करण्यात आले. त्यावेळी आकाशचा भाऊ प्रविण आणि आई मथुराबाई हे देखील सोबत आले. घाटीच्या दिशेने जात असताना आकाश प्रचंड विव्हळत होता. त्याने आपल्याला अख्ख्या तनपुरे कुटुंबियांनी मारहाण केली. साहेब त्यांना सोडू नका, असे म्हणत होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!