औरंगाबाद: राज्याचे पर्यावरण तथा राजशिष्टाचार मंत्री युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेनेचे कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी युवा संपर्क मोहीम, वॉर्डनिहाय बैठक अभियान राबवण्यात येत आहे. राज्याच्या दौऱ्यावर असलेले युवा सेनेचे सचिव वरून सरदेसाई गुरुवारी (दि.१२) मराठवाड्यात आले. या पार्श्वभूमीवर बुधवारी औरंगाबाद जिल्ह्यात होणाऱ्या बैठकांच्या तचारीबाबत पडेगाव, मिटमिटा, भावसिंगपुरा या वॉर्डात संयुक्त बैठक घेण्यात आली. माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, युवा सेना उपसचिव ऋषिकेश खैरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
राज्याच्या दौऱ्यावर असलेले युवा सेनेचे सचिव वरून सरदेसाई शुक्रवारी औरंगाबादेतील युवसेनेस संबोधीत करणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत गुरुवारी जालना येथील अंबड रोड वरील मातोश्री लॉन्स मंगल कार्यालय युवासेना पदाधिकारी यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. युवा सेनेचे संघटन वाढविण्यासाठी तसेच संघटनेची शक्ती राखण्यासाठी हा मेळावा यशस्वी करावा असे आवाहन अर्जुन खोतकर यांच्यातर्फे करण्यात आले.
शहरासह जिल्हा, तालुका, गट व गण निहाय गाव पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी तळागाळापर्यंत जाऊन मेळाव्याची माहिती लिहून युवा सैनिकांना मेळाव्यास उपस्थित राहण्याबाबत सूचना कराव्या असेही त्यांनी सांगितले. मेळाव्यासाठी युवा सेनेतर्फे जोरदार तयारी करण्यात आली असून शिवसेना महिला आघाडी, दलित आघाडी, अल्पसंख्यांक सेना आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. जालन्यानंतर शुक्रवारी (दि.१३) ३ वाजता श्री हरी पॅव्हेलियन याठिकाणी औरंगाबाद युवासेना पदाधिकाऱ्यांना ते मार्गदर्शन करतील.
महत्त्वाच्या बातम्या
- सीईटी रद्द ; अकरावी प्रवेशासाठी औरंगाबादेतील महाविद्यालय गजबजले!
- ‘मेळघाटातील ४९ नवजात शिशुंच्या मृत्युला यशोमती ठाकूर जबाबदार’, खा.नवनीत राणा स्मृती इराणींच्या भेटीला
- ‘अभाविप’ ७४ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अनोखे उपक्रम राबविणार
- ‘हॅलो, मी शरद पवार बोलतोय!’; बदलीसाठी थेट मंत्रालयात आलेल्या ‘त्या’ फोनमुळे खळबळ
- नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाबाबत खा. प्रीतम मुंडेंनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

