औरंगाबाद : भारतीय स्वातंत्र्याला ७४ वर्ष पूर्ण होऊन आपला देश या यावर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करतोय. यानिमित्ताने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाराष्ट्र प्रदेशात घर घर तिरंगा – मन मन तिरंगा अभियान येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिना निमित्ताने राबविणार आहे. या अभियानासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सामूहिक ध्वजारोहण, तिरंगा फेरी, भारत माता प्रतिमा पूजन, घरावर तिरंगा ध्वज लावणे अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद औरंगाबाद तर्फे संपूर्ण महानगरात यामध्ये 1 तिरंगा फेरी, ५० ते ६० ठिकाणी सार्वजनिक ध्वजारोहन, ३५ ठिकाणी सार्वजनिक भारतमाता प्रतिमा पूजन, घरोघरी भारत माता प्रतिमा पूजन १०००० घरात होणार आहे तसेच ९८ घरांवर तिरंगा फडकणार आहे. तसेच या अभियानामध्ये महाराष्ट्र अभाविपचे एकूण ३६८३ कार्यकर्ते सक्रिय असणार आहेत. तालुका, शहर, गावा पाडे अशा सर्व स्तरावर अभियान प्रमुख म्हणून कार्यकर्त्यांना जबादारी देण्यात आलेली आहे. अभाविप विविध वाड्या वस्त्या, गाव पाडे, शहर, नगर इत्यादी स्थानांवर राष्ट्रीय कलामंचच्या माध्यमातून एक शाम – देश के नाम, वकृत्व स्पर्धा, भव्य रांगोळी स्पर्धा, विविध विषयांवर परिसंवाद अशा विविध गतीविधींचे आयोजन करण्यात येणार आहे.
या अभियानाच्या माध्यमातून गाव, वस्ती, पाडा व कॉलनीतील पोहोचून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने विविध उपक्रमांमध्ये अभाविप नागरिकांना सहभागी करून घेणार आहे. आगामी वर्षभर अभाविप देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे. अशी माहिती अभाविप महाराष्ट्र प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी दिली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
