मुंबई : अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून सध्या विरोधक महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप करत आहेत. अशातच, बदलीसाठी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने मंत्रालयात फोन गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत बोलल्यानंतर तो फोन कट झाला.
नेमकं काय आहे प्रकरण ?
‘हॅलो, मी शरद पवार बोलतोय’, असा शरद पवार यांचा हुबेहूब आवाज काढत एका व्यक्तीने मंत्रालयात फोन केला. अचानक या प्रकरणात थेट शरद पवार यांचा फोन आल्याने गोंधळ निर्माण झाला. यानंतर तो फोन शरद पवार यांनी केला होता का, याची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीतून हा प्रकार वेगळाच असल्याची माहिती समोर येत आहे.
शरद पवार यांचा हुबेहूब आवाज काढत सदर व्यक्तीने मंत्रालयात फोन केला. मी सिल्व्हर ओक निवासस्थानातून बोलतोय, असे म्हणत या व्यक्तीने फोन घेणाऱ्या अधिकाऱ्यासोबत बदल्यांसदर्भात चर्चा केली. अमुक एका व्यक्तीची बदली अमुक ठिकाणी करा, असा आदेशच या व्यक्तीने दिला.
दरम्यान, या कॉलबाबत शंका वाटल्याने खातरजमा करण्यासाठी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सिल्व्हर ओक येथे कॉल केला. त्यावर साहेबांनी असा कोणताही कॉल केलेला नाही, असे तिथून सांगण्यात आले. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत याबाबत पोलिसांना खबर देण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन व्यक्तींना ताब्यात घेतल्याचे देखील समोर येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मंदिरांवर निर्बंध लादून आघाडी सरकारने आपल्याला हिंदूंच्या भावनांशी देणे घेणे नसल्याचेच दाखवून दिले आहे’
- शेतकऱ्यांचे महाबीज शासनाने सोडलं वाऱ्यावर; शेतकऱ्यांसोबत अनिल बोंडे करणार ठिय्या आंदोलन
- रानडे इन्स्टिट्यूटला भेट देणार; राजकारण होत असेल तर हाणून पाडू – उदय सामंत
- ‘दिल्लीत जाऊन आंदोलनाचे ढोंग करण्यापेक्षा महाराष्ट्रातील अत्याचारांच्या घटनांवर बोला’
- काँग्रेसची ट्विटर खाती बंद करण्याची कारवाई मोदी सरकारच्या दबावाखाली : नाना पटोले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
