मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज आज साठावा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
मोदी यांनी ट्विट तसेच पत्र पाठवत आपल्या शुभेच्छा दिल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन सकाळी साडे नऊच्या सुमारास उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणारं ट्विट करण्यात आलं. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. उद्धव यांना आरोग्य व दिर्घायुष्य लाभावे अशी मी प्रार्थना करतो,” असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
‘काँग्रेसची सरकारे पाडण्यासाठी भाजप साम, दाम, दंड भेद याचा वापर करत आहे’
यावर उद्धव ठाकरे यांनी ट्विट करून आभार मानले आहेत, ‘ माझ्या वाढदिवसानिमित्त आपण दिलेल्या शुभेच्छांसाठी मी आभारी आहे. आपले प्रेरणादायी शब्द मला व्यक्तिश: व राज्याच्या उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरतील. पुढील काळात देशाच्या उन्नतीमध्ये महाराष्ट्राचे भरीव योगदान असावे यासाठी आपले मार्गदर्शन आम्हाला लाभत राहील याचा पूर्ण विश्वास वाटतो’ असे ट्विट त्यांनी केले आहे.
‘ये दोस्ती… हम नही तोडेंगे…’, संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण दिलेल्या शुभेच्छांसाठी मी आभारी आहे. आपले प्रेरणादायी शब्द मला व्यक्तिश: व राज्याच्या उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरतील. पुढील काळात देशाच्या उन्नतीमध्ये महाराष्ट्राचे भरीव योगदान असावे यासाठी आपले मार्गदर्शन आम्हाला लाभत राहील याचा पूर्ण विश्वास वाटतो pic.twitter.com/gz5tWReBCv
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 27, 2020
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडिया द्वारे रात्री १२ वाजताच खास शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये ते म्हणतात, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाविकास आघाडीचे नेते सन्माननीय श्री. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हिरकमहोत्सवी वाढदिवसानिमित्तानं त्यांचे मन:पूर्वक अभिष्टचिंतन! त्यांना निरोगी व दिर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करतो.” या पोस्टमधील फोटोची चर्चा मात्र सर्वत्र रंगल्याचे दिसून आले.
ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरातील सिपीआर रुग्णालयाला करण्यात आली ‘ही’ मदत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

