नवी दिल्ली : कोरोनाचा सामना करत असलेले राजस्थान सध्या राजकीय संकटाचा देखील सामना करत आहे. युवा नेते सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याने गेहलोत सरकार संकटात आले आहे.
बंड केलेल्या सचिन पायलट यांनी अद्यापही माघार घेतली नसून, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अधिवेशन बोलावण्यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे. गेहलोत यांनी यासंदर्भात थेट राष्ट्रपतींची भेट घेण्याचा तसेच पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करण्याचाही इशारा दिला आहे.
BJP is using "saam, daam dand, bhed" to topple democratically elected Congress governments in the states and undermining every possible institution of the country. It is time for us to speak and save our democracy. #SpeakUpForDemocracy pic.twitter.com/aPJvsrMYDV
— Prithviraj Chavan (@prithvrj) July 26, 2020
दरम्यान, विविध राज्यात लोकशाही पध्दतीने निवडल्या गेलेल्या काँग्रेसची सरकारे पाडण्यासाठी भाजप साम, दाम, दंड भेद याचा वापर करत आहे. त्यामुळे विरोधात बोलण्याची व लोकशाही वाचाविण्याची वेळ आली आहे, अशी टिका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
दरम्यान,सत्ता आणि पैशाचा गैरवापर करून भाजप विविध राज्यातील विरोधी पक्षांची सरकारे पाडण्याचा प्रयत्न करत आहे. राजस्थानमध्ये भाजप लोकशाहीची संपवू पहात असल्याचा आरोप करत या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई येथील राजभावनासमोर आंदोलन करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
महत्वाच्या बातम्या-
#व्यक्तीविशेष : उद्धव ठाकरे – एक छायाचित्रकार मुख्यमंत्री कसा बनला ?
…ते शक्य नसल्यास इगतपुरीमध्ये जावून विपश्यना करावी; पाटील, फडणवीसांना आंबेडकरांचा खोचक सल्ला
आम्हाला काय म्हणायचं हे अजितदादांनी फोटोतून दाखवलं, भाजपच्या मित्रपक्षाचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

