Share

ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरातील सिपीआर रुग्णालयाला करण्यात आली ‘ही’ मदत

Published On: 

कोल्हापुर: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता ‘साठीत’ प्रवेश करत आहेत. आज त्यांचा वाढदिवस असून गेले २ दिवस शिवसेनेच्या पुढाकाराने राज्यभरात अनेक प्रकारची मदत केली जात आहे. कोल्हापुरात माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयास देखील मदत करण्यात आली आहे.

राजेश क्षीरसागर यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे हि माहिती दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख,मा.मुख्यमंत्री  उद्धवजी ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे माझ्या  विशेष प्रयत्नातुन मंजुर झालेल्या रु.१ कोटीच्या बेडस आणि कपाटांचे वितरण आज करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

‘मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट कसा होतो, हे नारायण राणे यांनी अनुभवले आहे’

यावेळी  मनपा आयुक्त डाॅ.मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा शल्यचिकीत्सक डाॅ.बी.सी केम्पी पाटील,प.महाराष्ट्र देवस्थान समिती कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर,अधिष्ठाता डाॅ. सौ.आरती घोरपडे,डाॅ.अजित लोकरे,शशिकांत रावळ(वाघमारे)महेंद्र चव्हाण,सुनिल करंबे व मान्यवर उपस्थित होते.

मला याची राजकीय किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण… राहुल गांधी

दरम्यान, शनिवारी खासदार अरविंद सावंत व मंत्री अनिल परब यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्त २५ रुग्णवाहिका देखील लोकार्पण करण्यात आल्या होत्या. तर, राजेश क्षीरसागर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर, “मातोश्रीवर टीका करणाऱ्यां शेवट नारायण राणेंसारखा होतो”, अशी टीका करत केवळ दिंडोरा पिटुन राज्यकारभार होत नाही असा सल्ला देखील दिला.

तारीख पे तारीख : मराठा आरक्षणावर सुनावणीसाठी आता नवी तारीख…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!