पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राणेंना अटक करण्यात आली होती. राणेंच्या अटकेनंतर सिंधदुर्गमध्ये संचारबंदी लावण्यात आली. त्यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत ट्वीट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात काल दिवसभर सुरू असलेला राजकीय खेळ सूडबुद्धीने झालेला असल्याचे आता स्पष्ट झाली असल्याचा आरोप यावेळी चंद्रकांत पाटलांनी यावेळी केला. ‘न्यायालयात राज्य सरकारने मांडलेला कोणताही मुद्दा टिकला नाही. या कारणाने राणे यांना न्यायालयाने पूर्णपणे जामीन दिला. यातून हेच दिसून येते की, सत्याचा विजय झाला’, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी नारायण राणेंच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारला धारेवर धरलं आहे.
महाराष्ट्रात काल दिवसभर सुरू असलेला राजकीय खेळ सूडबुद्धीने झालेला असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. न्यायालयात राज्य सरकारने मांडलेला कोणताही मुद्दा टिकला नाही. या कारणाने मा. नारायणराव राणे जी यांना न्यायालयाने पूर्णपणे जामीन दिला. यातून हेच दिसून येते की, सत्याचा विजय झाला. 1/5
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) August 25, 2021
गेल्या २० महिन्यात एखाद्या कार्यकर्त्याला किंवा नेत्याला अडकवणारी राज्य सरकारची एकही गोष्ट न्यायालयात टिकली नाही. न्यायालयाकडूनच प्रत्येक वेळी सरकारला चपराक बसली आहे. अनपेक्षितपणे मिळालेल्या सत्तेचा दुरुपयोग केल्यामुळे सरकारविरुद्ध न्यायालयाने दर वेळेस योग्य तोच निकाल दिला आहे, असंही टोला यावेळी चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.
गेल्या २० महिन्यात एखाद्या कार्यकर्त्याला किंवा नेत्याला अडकवणारी राज्य सरकारची एकही गोष्ट न्यायालयात टिकली नाही.न्यायालयाकडूनच प्रत्येक वेळी सरकारला चपराक बसली आहे. अनपेक्षितपणे मिळालेल्या सत्तेचा दुरुपयोग केल्यामुळे सरकारविरुद्ध न्यायालयाने दर वेळेस योग्य तोच निकाल दिला आहे.2/5
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) August 25, 2021
भाजप कधीही मनामध्ये राग ठेऊन कोणतेही काम करत नाही. राणे यांच्यासोबत जो अमानवीय प्रकार घडला, त्यामुळे त्यांची तब्येतसुद्धा बिघडली. त्यांना अटक केल्यानंतर कोणतेही वैद्यकीय उपचार वेळेवर दिले गेले नाहीत. त्यांची तब्येत ठीक झाल्यानंतर जन आशिर्वाद यात्रा पुन्हा सुरू होईल, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
भाजपा कधीही मनामध्ये राग ठेऊन कोणतेही काम करत नाही. मा. राणे जी यांच्यासोबत जो अमानवीय प्रकार घडला, त्यामुळे त्यांची तब्येतसुद्धा बिघडली. त्यांना अटक केल्यानंतर कोणतेही वैद्यकीय उपचार वेळेवर दिले गेले नाहीत. त्यांची तब्येत ठीक झाल्यानंतर जन आशिर्वाद यात्रा पुन्हा सुरू होईल. 3/5
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) August 25, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- “ठाकरे सरकार फार घाबरट म्हणून रात्री १२ वाजल्यापासून सिंधुदुर्गात संचारबंदी लावली”
- ‘जीभ ताब्यात ठेवा… शिवसैनिक ठाम आहे’; ठाण्यातील ‘त्या’ पोस्टरची चर्चा
- ‘ठगांपासून वाचण्यासाठी राष्ट्रपती राजवट हाच एकमेव मार्ग!’, नितेश राणेंच्या विधानाने खळबळ
- ‘भविष्यात पुन्हा असे बोलणार नाही’, नारायण राणेंची कोर्टात ग्वाही
- ‘नारायण राणेंच्या घरात घुसून कोथळा बाहेर काढतो’; शिवसेनेच्या आमदाराची धमकी

