Share

भरधाव ट्रकने तरुणाला चिरडले, मृतदेह रस्त्यावर ठेऊन नातेवाईकांचा संताप

Published On: 

🕒 1 min read

लातूर : देशात मागच्या काही वर्षांपासून रस्त्यांच्या अपघातात वाढ झालेली आहे. वाढत्या अपघातांना थांबवण्यासाठी प्रशासन मात्र कुठलेच पाऊल उचलताना दिसत नाहीये. अशीच एक अपघाताची घटना लातूर जिल्ह्यातील पानगावात घडली. दहा वर्षीय निखिल पांचाळ या विद्यार्थ्याला भरधाव ट्रकने चिरडले. या अपघाताला प्रशासनाचा हलगर्जीपणा असल्याचा आरोप ग्रामस्थानी केला.

पानगाव येथील रस्ते खराब असताना सुद्धा अवजड वाहनाना दिवसा प्रवेश दिल्यामुळे हा अपघात झाल्याचा ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रशासनाने लवकर लक्ष दिले असते तर या तरुणाचा जीव वाचाला असता. पण प्रशासनाला कुठल्याच गोष्टीचे गांभीर्य नसल्यामुळे हा अपघात घडला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी मृतदेह सहित रास्तारोको करीत जिल्हा अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन भेटत नाही तो पर्यंत आंदोलन करण्याची धमकी दिली आहे.

मागील काही दिवसांपासून वारंवार होत असलेल्या अपघाताच्या घटनेमुळे नागरिक हैराण आहेत. प्रशासनाचे लक्ष नसल्यामुळे अशा अपघातांना सामोरे जावे लागत असल्याची भावना नागरिकात आहे. प्रशासनाने अवजड वाहनांसाठी कडक कायदे करावेत. त्या कायद्याची अंमलबजावणी करावी आणि पानगावातील रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!