Share

‘सरकारच्या हलगर्जीपणामुळे अधिकारी होणाऱ्या युवकाला आत्महत्या करावी लागली’

Published On: 

मुंबई : एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याने शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात आत्महत्या केली आहे. स्वप्निल लोणकर (वय-२४) असे त्याचे नाव आहे. स्वप्निलने फुरसुंगी परिसरातीलराहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना बुधवारी (दि.२९ जून) रोजी घडली आहे. पण त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी काल आढळून आल्याने धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगत त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. त्यात तो पास देखील झाला होता. पण, यानंतरही त्याला नोकरी मिळाली नाही. याच नैराश्यातून त्याने हे धक्कादायक पाऊल उचलले.अधिकारी होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या या तरुणाच्या आत्महत्येमुळे विद्यार्थी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. यावर आता भाजपचे नेते व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी देखील सरकारवर टीकास्त्र डागले आहे.

‘नवयुवकांचे आणखी किती बळी घेणार आणखी राज्यसरकार स्वप्नील लोणकर या MPSC च्या विद्यार्थी पूर्व व मुख्य परीक्षा पास होऊनही मुलाखत झाली नाही.राज्यसरकार च्या हलगर्जी पणा मुळे अधिकारी होणाऱ्या युवकाला आत्महत्या करावी लागली.’ अशा आशयाचे ट्वीट करून लोणीकर यांनी सरकारवर निशाना साधला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!