Share

‘राज्य सरकारने अधिवेशनापासून पळ काढलाय’; अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीस कडाडले

Published On: 

मुंबई : राज्याचं पावसाळी अधिवेशन उद्या आणि परवा म्हणजेच ५ व ६ जुलै या दोन दिवसांतच पार पडणार आहे. कोरोनाचं कारण देत सरकारने हे अधिवेशन देखील अवघ्या दोन दिवसात गुंडाळण्याचं आयोजन केलं असून विरोधी पक्ष असलेल्या भाजपने मात्र यावर सडकून टीका केली आहे.

दरम्यान, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विविध प्रश्नांची चर्चा करण्यासाठी आणि रणनीती आखण्यासाठी भाजप नेत्यांची बैठक पार पडली. यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार नितेश राणे आदी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करण्यात आली. फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर विविध मुद्द्यांवरून हल्लाबोल केल्याचं दिसून आलं.

‘महाविकास आघाडी सरकारने आतापर्यंत 7 अधिवेशने घेतली, 36 दिवस कामकाज घेतले. आता हे आठवे अधिवेशन 2 दिवसांचे म्हणजे 8 अधिवेशन 38 दिवसांचे. एक अधिवेशन 5 दिवस सुद्धा नाही. यातील कोविड काळातील अधिवेशने 4 आणि त्याचे दिवस 14. म्हणजे कोविड काळ नसताना सुद्धा 4 अधिवेशन आणि त्याचे दिवस 24,’ असं फडणवीस यांनी सांगतानाच महाराष्ट्रात लोकशाहीला कुलूप लावले आहे अशी टीका आघाडी सरकारवर केली.

पुढे ते म्हणाले, राज्य सरकारने अधिवेशनापासून पळ काढला आहे. चहापान ही फार छोटीशी परंपरा. ज्यांनी लोकशाहीला कुलूप लावले, त्यांच्याकडून चहापानाची अपेक्षा आम्हाला नाही, असा घणाघात देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे यंदाचे अधिवेशन जरी केवळ २ दिवसांचे असले तरी हे अधिवेशन देखील वादळी होणार असल्याची चिन्हे आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!