मुंबई : राज्याचं पावसाळी अधिवेशन उद्या आणि परवा म्हणजेच ५ व ६ जुलै या दोन दिवसांतच पार पडणार आहे. कोरोनाचं कारण देत सरकारने हे अधिवेशन देखील अवघ्या दोन दिवसात गुंडाळण्याचं आयोजन केलं असून विरोधी पक्ष असलेल्या भाजपने मात्र यावर सडकून टीका केली आहे.
दरम्यान, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विविध प्रश्नांची चर्चा करण्यासाठी आणि रणनीती आखण्यासाठी भाजप नेत्यांची बैठक पार पडली. यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार नितेश राणे आदी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करण्यात आली. फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर विविध मुद्द्यांवरून हल्लाबोल केल्याचं दिसून आलं.
‘आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, दुधाचे प्रश्न, धान घोटाळा, कोरोनाचा विषय, बारा बलुतेदार यांचे प्रश्न असे कोणतेच प्रश्न मांडायचे नाही. भ्रष्टाचार मांडायचा नाही, याची व्यवस्था केली आहे. जे विषय सभागृहात मांडू दिले जाणार नाही, ते सभागृहाबाहेर मांडू, आंदोलन करू. तेव्हा बोलू नका आंदोलन कशासाठी करताय, चर्चा करा,’ असं भाष्य करत फडणवीसांनी येत्या काळात अशा विविध प्रश्नांनावरून भाजप तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला आहे.
ना लक्षवेधी, ना प्रश्नोत्तरे, ना लेखी उत्तरे
लक्षवेधी सूचना, प्रश्नोत्तरे, अर्धा तास चर्चा घेण्यात येणार नाहीत. स्वीकृत झालेल्या प्रश्नांना लेखी उत्तरे देता आली असती. पण, ते सारे प्रश्न व्यपगत करण्याचा निर्णय घेण्यात आला. एकही संसदीय आयुध वापरता येणार नाही, असा आदेश काढण्यात आलाय, असं भाष्य करतानाच राज्य सरकारने अधिवेशनापासून पळ काढलाय अशी टीका देखील देवेंद्र फडणवीस यांनी केलीये.
महत्वाच्या बातम्या
- उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी पुष्कर सिंह धामी विराजमान !
- ‘राज्य सरकारने अधिवेशनापासून पळ काढलाय’; अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीस कडाडले
- …अन् भाजपच्या चित्रा वाघ राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला म्हणाल्या, ‘पोलिसांकडे तक्रार कर मी तुझ्या सोबत’
- अबब ! महाविकास आघाडी सरकारने प्रसिद्धी मोहिमेवर केले तब्बल १५५ कोटी खर्च
- सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना मिळणार दीड कोटीपर्यंतची कामे, आ. सतीश चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

