Share

प्रियांकाच्या अमेरिकेतील हॉटेलमधील वडापावची किंमत ऐकून होताल थक्क

Published On: 

मुंबई :  ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची स्टाइल आणि ग्लॅमरमध्ये कोणाशीच बरोबरी होऊ शकत नाही.  बॉलीवूड ते हॉलीवूड पर्यंत तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर उत्तम स्थान निर्माण केल आहे. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा तिची चर्चा सुरू झाली आहे.  काही दिवसांपूर्वी अमेरिकेत भारतीय हॉटेल सुरु केलं. तिच्या या हॉटेलचे नाव ‘सोना’ असे आहे. तिच्या या रेस्टॉरंटमध्ये भारतीय पदार्थ मिळतात. प्रियांकाच्या या हॉटेलमध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. नुकतेच लोकप्रिय निर्मात्या लोला जेम्स यांनी देखील प्रियांकाच्या ‘सोना’ या हॉटेलला भेट दिली आहे.

vada pav, priyanka chopra,

प्रियांकाच्या सोना या हॉटेलमध्ये लोला यांनी मुंबईची शान म्हणजेच वडा पाव खाल्ला. याशिवाय लोलाने भेळ, चाट आणि बरेच पदार्थ खाल्ले. या विषयी सांगत लोलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. ‘यात आश्चर्य नाही न्यूयॉर्कमध्ये असलेलं हे सोना अप्रतिम आहे. या रुचकर आणि चविष्ट जेवणाकडे एकदा नजर टाका,’ अशा आशयाचे कॅप्शन लोलाने दिले आहे.

मात्र प्रियांकाच्या सोना हॉटेलमध्ये या वडा पावची किंमत १४ अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास १ हजार रुपये आहे. प्रियांकान सुरू केलेल्या या हॉटेलमध्ये भारतीय पदार्थ परदेशातील लोकांना सहज रित्या खायला मिळत आहे. तसेच मुंबईचा वडा पाव न्यूयॉर्कमधील लोकांच्या देखील आवडीचा ठरत असल्याने ही बाब खरच कौतुकास्पद ठरणारी आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!