मुंबई : टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेतील बुधवारचा दिवस भारतीयासाठी सकाळी एक आनंदाची बातमी घेऊन आला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेतील भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीत धडक मारली आहे. यासह नीरज चोप्राकडून पदकाची आशा वाढली आहे.
पुरुष भालाफेक स्पर्धेत ८३.५० मीटरपर्यंत भाला फेकणाऱ्या किंवा यापेक्षा कमी कामगिरी करणाऱ्या सर्वोत्तम १२ खेळाडूंना अंतिम फेरीत प्रवेश दिला जातो. बुधवारी पार पडलेल्या अ गटाच्या पात्रता फेरीत नीरजने ८६.६५ मीटरपर्यंत भाला फेकत थेट अंतिम फेरीत धडक मारली आहे. अद्यापही ब गटातील खेळाडूंची स्पर्धा बाकी आहे. मात्र नीरजने ८३.५० पेक्षा अधिक लांब भाला फेकत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे.
What a brilliant start from Neeraj Chopra in #JavelinThrow . Announces his arrival in grand style. Qualifies for the final in his first throw finishing top in his group. Absolutely brilliant . pic.twitter.com/BX7oRFuUng
— Virender Sehwag (@virendersehwag) August 4, 2021
अ गटात नीरज चोप्रा १५व्या स्थानी होता. महत्वाची बाब म्हणजे नीरजने ही कामगिरी त्याने पहिल्याच प्रयत्नात केली. नीरजसह फिनलॅण्डचा खेळाडू लेस्सी इतीलतोलो आणि जर्मनीचा वेट्टेर जोहान्सनेही अंतिम फेरीत धडक मारली आहे. जोहान्सने ८५.६४ आणि लेस्सीने ८४.५० इतक्या मीटरपर्यंत भाला फेकला आहे. येत्या ७ ऑगस्ट रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- टीम इंडियात रहाणेविरुद्ध रचला जातोय कट? गावसकरांनी केला आरोप
- लेखापाल मारहाण प्रकरण, शिवसेना खा.भावना गवळी अडचणीत
- काँग्रेसची शिवसेनेवर पुन्हा कुरघोडी; शिवसेनेच्या माजी राज्यमंत्र्याने केला काँग्रेसमध्ये प्रवेश
- ‘पूजा चव्हाण प्रकरणात गोत्यात आलेल्या संजय राठोडांना मंत्रिपद देण्याची शिवसेनेला घाई’, भाजपची टीका
- ‘केवळ विवाहासाठी धर्म-परिवर्तन चुकीचं’; अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलं ‘जोधा-अकबर’चं उदाहरण


