🕒 1 min read
सोलापूर- अकलूज-माळेवाडी नगरपरिषद व नातेपुते येथे नगरपंचायत स्थापन करण्याची अधिसूचना राज्य सरकारचे उपसचिव सतीश मोघे यांनी राज्यपालांच्या सहीनिशी काढली आहे. दरम्यान, तीन आठवड्यात याबाबत अध्यादेश काढावा, असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला 17 जुलै रोजी दिले होते. या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अकलूज-माळेवाडी व नातेपुते ग्रामस्थांच्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे.
अकलूज-माळेवाडी नगरपरिषद आणि नातेपुते नगरपंचायतसंदर्भात ता. ११ सप्टेंबर २०१९ रोजी पहिला अध्यादेश निघाला होता. त्यानंतर राज्यात सत्ता परिवर्तन झाले आणि अकलूज-माळेवाडी नगरपरिषद आणि नातेपुते नगरपंचायतीची प्रश्न प्रलंबित होता.अकलूज व नातेपुते ग्रामपंचायतीच्या वतीने अॅड. अभिजित कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेस न्याय मिळाला आहे.
हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी गेली 43 दिवस अकलूज येथे प्रांताधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरू होते. अकलूज नगरपरिषद व नातेपुते नगर पंचायतीबाबत अंतिम अधिसूचना निघाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच अकलूज, नातेपुते, माळेवाडी येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. नेतेमंडळींनी एकमेकांना फोन करून शुभेच्छा दिल्या. भावी नगरसेवक, नगराध्यक्ष आणि त्यांचे समर्थक फटाक्यांची आतषबाजी करीत आनंद व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘संसदेत आलात तर, मी टक्कल करेल’; देरेक ओब्रायन यांचे अमित शहांना आव्हान
- टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राची अंतिम फेरीत धडक, पहिल्याच प्रयत्नात यशस्वी
- टीम इंडियात रहाणेविरुद्ध रचला जातोय कट? गावसकरांनी केला आरोप
- लेखापाल मारहाण प्रकरण, शिवसेना खा.भावना गवळी अडचणीत
- काँग्रेसची शिवसेनेवर पुन्हा कुरघोडी; शिवसेनेच्या माजी राज्यमंत्र्याने केला काँग्रेसमध्ये प्रवेश

