नवी दिल्ली: पेगासस प्रकरणामुळे विरोधी पक्षाने केंद्राला चांगलेच घेरले आहे. विरोधकांनी पेगासस प्रकरणाची चौकशी आणि संसदेत याबाबतीत चर्चा होण्याची मागणी केली आहे. आता या मुद्यावरूनच तृणमूल काँग्रेस नेते खासदार डेरेक ओब्रायन यांनी गृहमंत्री अमित शहा यांना आव्हान दिले आहे.
जर अमित शाह यांनी संसदेत येऊन निवेदन दिले, तर टक्कल करेल असे तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी म्हटले आहे. विरोधकांची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला संसदेत चर्चा हवी आहे. कृषी कायदे, अर्थव्यवस्था, रोजगार, महागाई आणि पेगासस या तीन मुद्द्यांवर विरोधी पक्षाला अगोदर चर्चा हवी आहे. असे देखील ते म्हटले आहे.
मी अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेत बघितले नाही , त्यामुळे या हरवलेल्या व्यक्तींबद्दलची नोटीस काढणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
पेगासस, एका नऊ वर्षाच्या दलित मुलीवर झालेला सामूहिक बलात्कार यावर गृहमंत्र्यांनी संसदेत येऊन उत्तर द्यायला हवे. त्यामुळे अमित शाह यांनी राज्यसभा वा लोकसभेत येऊन सामूहिक बलात्काराच्या घटनेवर निवदेन केलं, तर मी टक्कल करून तुमच्या कार्यक्रमात येईन. असे आव्हान डेरेक ओब्रायन यांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राची अंतिम फेरीत धडक, पहिल्याच प्रयत्नात यशस्वी
- टीम इंडियात रहाणेविरुद्ध रचला जातोय कट? गावसकरांनी केला आरोप
- लेखापाल मारहाण प्रकरण, शिवसेना खा.भावना गवळी अडचणीत
- काँग्रेसची शिवसेनेवर पुन्हा कुरघोडी; शिवसेनेच्या माजी राज्यमंत्र्याने केला काँग्रेसमध्ये प्रवेश
- ‘पूजा चव्हाण प्रकरणात गोत्यात आलेल्या संजय राठोडांना मंत्रिपद देण्याची शिवसेनेला घाई’, भाजपची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
