लखनऊ : उत्तर प्रदेशच्या कानपूर येथील आरोपी विकास दुबे व त्याच्या पाच साथीदारांच्या एन्काऊंटर प्रकरणात पोलिसांना क्लीन चिट मिळाली आहे. तीन सदस्यीय न्यायिक तपास आयोगाने आपला अहवाल राज्य सरकारला सोपवला आहे. त्यानुसार पोलिसांच्या विरोधात काहीही पुरावा नाही. चकमक योग्य होती, असे आयोगाने अहवालात नमूद केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. एस. चौहान यांच्या अध्यक्षतेखाली न्यायिक आयोगाची स्थापना करण्यात आली होती. त्यात अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती शशिकांत अग्रवाल, राज्याचे माजी पोलिस महासंचालक के. एल. गुप्ताही सामील होते. गुप्ता म्हणाले, आयोगाने आपला अहवाल राज्य सरकारला सोपवला आहे. अहवालाची एक प्रत सर्वोच्च न्यायालयासह सादर करण्यात येणार आहे. आयोगाने १३० पानी अहवाल दिला आहे.
तपासादरम्यान आयोगाने चकमकीच्या ठिकाणाचे निरीक्षण केले. बिकरू गावाचाही दौरा केला. चकमकीत सहभागी पोलिसांच्या टीममधील सदस्यांची साक्ष घेण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर घटनास्थळी असलेले लोक व माध्यमांशी देखील चर्चा केली. विकास दुबेची पत्नी, नातेवाईक व गावातील लोकांनाही जबाबासाठी बोलावले. परंतु कोणीही पुढे आले नाही.
दरम्यान, १० जुलै २०२० रोज आरोपी विकास दुबेचा एन्काऊंटर करण्यात आला होता. सकाळी सहा वाजता दुबेला कानपूरला घेऊन जात असताना हा एन्काऊंटर झाला. उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांच्या हत्येला जबाबदार असलेला मुख्य आरोपी विकास दुबेला अटक करण्यात आली होती. मध्य प्रदेशातील उज्जैन येथून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या होत्या.
पुढील अधिक चौकशीसाठी त्याला कानपूरला घेऊन जात असताना पोलिसांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाला. त्यावेळी विकास दुबेने पोलिसांचं पिस्टल घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. तसंच पोलिसांवर फायरिंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी त्याला मारण्यात आले अशी माहिती पोलिसांनी दिली होती.
महत्वाच्या बातम्या
- कोहली विजयाचा ‘चौकार’ मारण्यासाठी तयार, संजू सॅमसन थांबवू शकणार?
- राज्य केंद्रापुढे हतबल; हात जोइून विनंती करतो, आता तरी मदत करा – राजेश टोपे
- आम्ही पाया पडायला तयार पण केंद्राने राज्याला अधिक ऑक्सिजनचा पुरवठा करावा – राजेश टोपे
- सीताराम येचुरींना पुत्रशोक; कोरोनाने अवघ्या ३४ व्या वर्षी झालं निधन
- मनोरंजन थांबलं नाही ; आता महाराष्ट्रा बाहेर होणार मराठी मालिकांचे चित्रीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

