Share

‘नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे गुलाम, गुलामाच्या बोलण्याला फारसं महत्त्व नसते’

Published On: 

मुंबई : भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आरक्षण कायद्याच्या विरोधात आहेत. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी दोन्ही बाजुने भाजप खेळतेय असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता.

न्यायालयाचा निकाल आल्यानंतर राज्य सरकारवर चौफेर टीका होऊ लागल्याने आता महाविकास आघाडी सरकारने विरोधी पक्षालाच यासाठी जबाबदार ठरवले आहे. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले होते.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री व प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून भाजपावर करण्यात येणाऱ्या टिकेवरून आमदार खोत यांनी जोरदार पलटवार केला आहे. मराठा आरक्षणावर ते सातत्याने भाष्य करत आहेत, मलिक यांना मला विचारायचं की पंधरा वर्ष तुमचं सरकार राज्यामध्ये होतं, त्यावेळी तुम्ही मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही ? नवाब मलिक मला जाणीव आहे, तुम्ही राष्ट्रवादीचे गुलाम आहात, आणि गुलामाच्या बोलण्याला फारसं महत्त्व असत नाही, त्यामुळे तुम्हाला आम्ही गांभीर्याने घेत नाही, परंतु मराठा समाजामध्ये दुही निर्माण करून त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत असाल तर मराठा समाज हा लढावू आहे. जी गोष्ट त्याला मिळत नाही, ते ती गोष्ट लढाई करून मिळवतो, असेही खोत यांनी यावेळी म्हटले आहे.

तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘मला मुख्यमंत्र्यांची आता दया येते, केंद्राकडे बोट दाखवत त्यांनी केंद्राला हात जोडलेले आहेत. 370 कलम रद्द केलं, त्या पद्धतीने मराठ्यांना आरक्षण द्या, इथे काय कलम लागलंय का ? असा सवाल करत, कोरोना स्थिती केंद्राकडे बोट, व्हेंटिलेटर केंद्राकडे बोट, लस केंद्राकडे बोट, आरक्षण केंद्राकडे बोट, मग राज्याला सरकार चालवायला जमत नसेल, तर काही दिवस केंद्राकडे राज्य चालवायला द्या’ असेही यावेळी खोत म्हणाले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पुढाकार घेऊन मराठा आरक्षणास मान्यता द्यावी, अशी मागणी केली आहे. १०२ व्या घटना दुरुस्तीचा अधिकार राज्य सरकारकडे नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगतानाच राष्ट्रपती किंवा केंद्र सरकारच याबाबत निर्णय घेऊ शकतात असं भाष्य केलं होतं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री केंद्र सरकारकडे याबाबत मागणी करत असून त्याला केंद्र कसा प्रतिसाद देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!