Share

‘छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्’; आशिष शेलारांचा ठाकरे सरकारवर घणाघात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : 10 वी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 11 वी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी परीक्षा होणार असल्याचं राज्य सरकार कडून सांगण्यात आले होते मात्र आता 11 प्रवेशसाठी होणारी सीईटी परीक्षा रद्द करण्याचा महत्वाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. 28 मेचा यासंदर्भाताल अध्यादेश न्यायालयाने रद्द करत अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांनुसारच करावेत, असे निर्देश दिले आहेत.

यावरून आता ठाकरे सरकारवर भाजपने हल्लाबोल केला असून न्यायालयाने फटकारल्याची टीका करत ‘छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्’ असा टोला भाजप आमदार आशिष शेलार यांनी लगावला आहे. अनन्या पत्की या आयसीएससीच्या विद्यार्थिनीने सीईटी परीक्षा घेण्याबाबतचा परिपत्रकाविरोधात वडील ऍड. योगेश पत्की यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यासंदर्भात न्यायालयाने काल निकाल देत राज्य सरकारला मोठा धक्का दिला आहे.

‘अकरावीची सीईटी रद्द करताना मा. उच्च न्यायालयाने राज्य सरकारचा हा निर्णय अनियंत्रित, अवास्तव, कठोर, भेदभाव करणारा, लहरी आणि घटनेच्या समानतेच्या हक्काचे उल्लंघन करणारा आहे, अशा कठोर शब्दांत ठाकरे सरकारला फटकारलेय. “छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्” अशा प्रकारची ही चंपी झालेय,’ अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

यासोबतच, ‘ठाकरे सरकारच्या लहरीपणामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले. वारंवार आम्ही अनेक बाबी लक्षात आणून दिल्या. न्यायालयाने फटकारले. तरीही लहरी सरकार काहीही शिकलेच नाही. शिक्षणाचा हा अभूतपूर्व घोळ घालणाऱ्या आघाडी सरकारला आता विचारावेसे वाटते तुमची “इयत्ता कंची?” ‘ असा खोचक सवाल देखील आशिष शेलार यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!