🕒 1 min read
चंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून अनेक बँकांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे समोर येत आहे. यावर वेळोवेळी रीझर्व्ह बँकेकडून यावर कारवाई देखील करण्यात येत आहे. यामध्ये आता आणखी का बँक घोटाळ्याची भर पडली आहे.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चंद्रपूर शहरातील शाखेत मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे.
या घोटाळ्याचा आकडा तब्बल दीड कोटींवर असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असल्याने ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. बँकेतील रोखपाल पदावर असलेल्या व्यक्तीने ग्राहकांची फसवणूक केली असल्याची माहिती देण्यात आली असून ग्राहकांनी दिलेले पैसे अकाउंटला न टाकता स्वतः खिशात टाकले. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
गेल्या 2 वर्षांपासून जिल्हा परिषद चंद्रपूर समोर असलेल्या बँक शाखेत नोकरीला असलेल्या रोखपालाने हा गैरव्यवहार केला असून बँकेशी संलग्न एका सहकारी सोसायटीने या शाखेत भरायला दिलेली मोठी रक्कम खात्यात जमा न झाल्याने हा प्रकार समोर आला. तर या घोटाळ्याची व्याप्ती तपासण्यासाठी शुक्रावरी रात्रभर चौकशी सुरु होती. या आधी देखील बँकेचे तत्कालीन अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगवास झाला होता. तर ते पायउतार झाल्यान्नात्र आता पुन्हा नवी सत्ता आल्या नंतर देखील पुन्हा एक मोठा गैरव्यवहार समोर आला आहे.
दरम्यान, बँक ग्राहकांची चिंता वाढली असून ग्राहकांच्या हिताचा विचार केला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांनीही बँकेच्या संबंधी आपली सगळी माहिती आणि पैसे योग्यरित्या भरले जात आहेत की नाही याची तपासणा करणं महत्त्वाचं असल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- पहिला मंगला विंचुर्णे बर्दापूरकर स्मृती पुरस्कार राखी तांबटला प्रदान
- कर वसुलीसाठी पोलिसांची मदत घ्या, उस्मानाबाद नगराध्यक्षांचे निर्देश
- विधानसभा अध्यक्षपदाबाबत पवार-ठाकरे निर्णय घेतील, एकनाथ शिंदेंनी कॉंग्रेसचा उल्लेख टाळला
- बासरी वादनाने नाट्य परिषदेच्या मासिक सभेस प्रारंभ
- पूजा चव्हाण प्रकरणी त्या मंत्र्याची एकनाथ शिंदेकडून पाठराखण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
