🕒 1 min read
औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांची खूप वर्षाची औरंगाबादचे नाव संभाजीनगर करणे ही इच्छा आहे. ती पूर्ण होणार आहे अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते आढावा बैठकीसाठी शहरात आले होते. यावेळी पत्रकारांशी नामांतर मुद्द्यावर त्यांनी संवाद साधला.
ते म्हणाले, औरंगाबाद येथील नागरिकांची इच्छा आहे. त्यामुळे संभाजीनगर नाव देणे महत्त्वाचे आहे. तसेच औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचे पत्र मुख्यमंत्री यांनी केंद्र सरकारला पाठवले आहे. यावर लवकर निर्णय होणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारकडून महापुरूषांचे नाव देण्याबाबत कोणतीही अडचण असण्याचे कारण नाही. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात छत्रपती संभाजी महाराज यांना मानणारा देश आहे. त्यामुळे लवकर ते होईल असा विश्वास मंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने राज्यातील सर्व सामन्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणार असल्याची ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. १५०० स्वेअर फुट बांधकामाला आता परवानगीची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले. ज्या बांधकामाला परवानगी आवश्यक आहे, ती केवळ १० दिवसात मिळेल असेही ते म्हणाले. औरंगाबाद दौऱ्यावर आले असता त्यांनी विविध विकास कामांचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
महत्वाच्या बातम्या
- शिक्षण मंत्री महोदया कृपया हे थांबवा…आमदारांचा घरचा आहेर
- मी माजी पंतप्रधानांचा मुलगा असलो तरी तत्वासाठीची लढाई सोडून देणार नाही
- लातुर मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांनी घेतली कोरोना लस
- Fact Check : एप्रिल महिन्यात सर्व प्रवासी रेल्वेगाड्यांच्या सेवा पुन्हा सुरू होणार ?
- १५०० स्वेअर फूटापर्यंतच्या बांधकामाला परवानगीची गरज नाही- शिंदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
