Share

‘अहिल्यादेवींचा इतका आदर वाटतो तर पवारांनी धनगर समाजाला आरक्षण का दिले नाही?’

Published On: 

जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथील खंडोबा गडावर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पार पडले आहे. या कार्यक्रमाला होळकर घराण्याचे वंशज आणि छत्रपती संभाजीराजे हेदेखील उपस्थित होते.

या पुतळयाच उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बोलताना शरद पवार बोलत होते, यावेळी त्यांनी हिल्यादेवी होळकर यांच्याविषयीचा आदर व्यक्त केला. याच पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी पवारांवर टीका केलेली आहे.

अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी शरद पवार यांना इतकेच प्रेम आहे तर आजपर्यंत त्यांनी धनगर समाजाला अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील आरक्षण का मिळवून दिले नाही, असा सवाल रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला. तुम्ही ५० वर्षे सरकारमध्ये होता, मग ही गोष्ट का जमली नाही. आतादेखील तुम्ही राज्यात सत्तेत आहात. मग धनगर समाजाला ST प्रवर्गाचे आरक्षण देणे तुम्हाला का जमत नाही, अशी विचारणा सदाभाऊ खोत यांनी केली.

यावेळी त्यांनी जेजुरी गडावरील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा हट्ट का धरण्यात आला, असा प्रश्न उपस्थित केला. राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी तळागाळातील लोकांसाठी काम केले. जर मेंढपाळाच्या मुलाने त्यांच्या पुतळ्याचे उद्घाटन केले तर शरद पवार यांनी स्वत:च्याच हस्ते उद्घाटन करण्याचा हट्ट का धरला? हा मुद्दा केवळ पुतळ्याचा उद्घाटनाचा नाही. धनगर समाजाला फसवले गेल्यामुळे तो संतप्त झाला आहे. हीच फसवणारी माणसं आमच्या दैवताचं गुणगान गाणार असतील तर गोपीचंद पडळकर यांच्यासारखे वेडे पीर दोन हात करायला उभे राहतील, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले.

महत्त्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!