🕒 1 min read
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर शुभमन गिल सध्या त्याच्या नवीन हेअर स्टाईलमुळे चर्चेत आला आहे. पायाच्या दुखापतीमुळे गिल गेल्या महिन्यात इंग्लंडहून मायदेशी परतला होता. घरी परतल्यावर, गिलने त्याचे केस लहान आणि कलर केले आहेत. त्याने सोशल मीडियावर त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक व्हिडिओ अपलोड केला आहे. गिलचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
चाहते व्हिडिओवर स्वतःच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काहीजणांना गिलचा हा लूक आवडला तर कोणी त्याला सल्ला देताना दिसला. एका वापरकर्त्याने लिहिले, ए तू पांड्या सोबत नको राहू यार. दुसर्या वापरकर्त्याने लिहिले, ‘पहिला एक छान होता.’ आणखी एका वापरकर्त्याने गिलला खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. पांड्या त्याच्या लूकमुळे बराच चर्चेत असतो. आता पांड्या नंतर शुभम गिल चर्चेत आला आहे.
https://www.instagram.com/reel/CSZBGQdp1rG/?utm_source=ig_web_copy_link
डाव्या हाताचा सलामीवीर असलेल्या गिलने कसोटी सामन्यांमध्ये 3 अर्धशतकांसह एकूण 414 धावा केल्या असून 91 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. गिलच्या नावावर एकदिवसीय सामन्यात 49 धावा आहेत. जानेवारी 2019 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या गिलला भविष्यातील स्टार म्हणून संबोधले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘व्यंकय्या नायडूंना सभागृहात अश्रू अनावर’, ‘यामुळे’रात्रभर झोपू शकले नाही
- सोलापूर जिल्ह्यावर लादण्यात आलेल्या निर्बंधांना व्यापारी महासंघाने केला तीव्र विरोध
- ‘खेळाडूंना ओळखण्यासाठी शेजाऱ्याकडून चष्मा उधार घ्यावा लागेल’, सोशल मीडियावरून मोदींवर टीका
- निर्बंध शिथिल करण्याबाबत पुण्याला वेगळा आणि सोलापूरला वेगळा न्याय का ?
- ‘अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी समिती गठित करणार’- वर्षा गायकवाड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
