Share

‘तुम्ही नगरसेवक फोडू शकता परंतू जनतेला नाही, नवी मुंबईत भाजपचाच महापौर होणार’

Published On: 

नवी मुंबई:- येत्या काही दिवसांत राज्यातील 5 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर होणार आहेत. यामध्ये नवी मुंबई, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली, वसई विरार आणि कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होत आहे. त्यासाठी भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक तोंडावर आली असताना भाजपला लागलेली गळती मात्र थांबलेली नाही. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांची आघाडी होणार असल्याने आत्तापर्यंत १४ नगरसेवकांनी शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. असे असतानाही येत्या निवडणुकीत जनतेची साथ गणेश नाईक यांनाच मिळेल असा दावा माजी खासदार संजीव नाईक यांनी डोंबिवली येथे केला आहे.

केवळ फोडाफोडीचे राजकारण करण्याचे काम विरोधकांना राहीले आहे. तुम्ही नगरसेवक फोडू शकता परंतू जनतेला नाही फोडू शकत. जाती, वर्ण, धर्म यांच्या पलीकडे जाऊन नवी मुंबईचा विकास गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या नगरसेवकांनी केला आहे, असे संजीव नाईक यांनी म्हटले आहे.

गेल्या २५ वर्षात ऐन निवडणुकीत अनेक जण सोडून गेले असले तरी नवी मुंबईकरांनी गणेश नाईक यांच्याच हातात कायम सत्ता दिली आहे. आत्तासुद्धा हा विश्वास जनता कायम ठेवेल व भाजपचाच महापौर महापालिकेत बसेल, असंही नाईक म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!