पुणे:- ५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. कोरोनाचे सावट लक्षात घेता मोजक्याच निमंत्रितांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला असला तरी जगभरातील रामभक्तांनी हा सोहळा असेल त्या ठिकाणाहून बघत या ऐतिहासिक क्षणाचा अनुभव घेतला होता.
आता, या राम मंदिराच्या प्रत्यक्ष निर्माण कार्यास देखील सुरुवात झाली आहे. तर, मंदिर उभं करण्यासाठी लागणार खर्च हा करोडो रामभक्तांमार्फत संकलित केला जात आहे. विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर निर्माण सहयोग अभियान सुरु केले आहे. भाजपने देखील निधी संकलनासाठी सक्रिय सहभाग घेतला असून देशभरात हे अभियान राबविले जात आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीसाठी अनेकजण आर्थिक मदत करत आहेत. राम मंदिराच्या उभारणीसाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पाच लाख तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक लाखाचा निधी दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही काल निधी दिला. मात्र, निधीची रक्कम त्यांनी जाहीर केलेली नाही.
अयोध्येत प्रभू श्री राम यांच्या भव्य मंदिर उभारणीसाठी निधी समर्पण करण्यात आले. यावेळी संभाजीनगरचे कार्यवाह सुधीर जवळेकर, महानगर संघचालक वंजारवाडकर,भागाचे संघचालक दिगंबर परुळेकर,कोथरूड मंडलाचे अध्यक्ष पुनित जोशी,पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर,सुधीर जी पाचपोर उपस्थित होते. pic.twitter.com/kQUJoHqi6y
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) February 1, 2021
चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी समर्पण निधीचा धनादेश पुणे महानगर संघचालक रविंद्र वंजारवाडकर यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी भागाचे संघचालक दिगंबरजी परुळेकर, संभाजीनगर कार्यवाह सुधीरजी जवळेकर, कोथरूड मंडलाचे अध्यक्ष पुनित जोशी, पुणे शहर भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, सुधीरजी पाचपोर आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- गृहमंत्री अनिल देशमुखांसोबत अट्टल गुन्हेगारांचे फोटोसेशन
- “शुबमन गिल येत्या काळात जगातील सर्वोत्कृष्ट सलामी फलंदाजांच्या यादीत असेल”
- आता ६ फेब्रुवारीला शेतकरी करणार देशभर चक्का जाम
- ‘देशविघातक वक्तव्य करणाऱ्या शरजिल उस्मानीला तात्काळ अटक करा’
- आता मिळावा फक्त एका मिस्ड कॉलवर LPG गॅस सिलेंडर !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

