मुंबई – शेतकरी महिनोंमहिने कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत बसले आहेत… लोक मरत आहेत परंतु पंतप्रधान ठोस निर्णय घेत नाहीयत… काय बिघडणार आहे शेतकऱ्यांना न्याय दिला तर… कृषी कायदे रद्द केले तर असा रोखठोक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.
बायका – पोरं घेऊन थंडी वाऱ्यात…कोरोना असताना शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. त्यांना कोण म्हणतंय खलिस्तानी तर कोण बोलतंय पाकिस्तानी अरे काय चाललंय हे ? असा संतप्त सवालही छगन भुजबळ यांनी केला आहे.
जे तुमच्या आमच्यासाठी… हा देश अन्नधान्याने दुष्काळी होता त्यावेळी या शेतकऱ्यांनी अन्नधान्य पिकवलं आणि परदेशातही एक्स्पोर्ट केलं त्या शेतकऱ्यांना दोन – चार दिवस ठिक आहे. महिनोंमहिने आंदोलन करावे लागते आहे. पंतप्रधान मात्र याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. कृषी कायदे रद्द करा… मागे घ्या… तो रिफिल करा… नवीन कायदा बनवायचा असेल तर नवीन बनवा आणि शेतकऱ्यांबरोबर चर्चा करा असा सल्लाही छगन भुजबळ यांनी दिला आहे.
'कृषी कायदे रद्द केले तर असं काय बिघडणार आहे?'…
आर्थिक घोटाळे प्रकरणात जामिनावर सुटका झालेले छगन भुजबळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना कृषी कायदे रद्द करण्याचा सल्ला देत आहेत… pic.twitter.com/sSnuGgukNZ— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 2, 2021
दरम्यान,, आता याच मुद्द्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी भुजबळ यांना टोला लगावला आहे.’कृषी कायदे रद्द केले तर असं काय बिघडणार आहे?’…आर्थिक घोटाळे प्रकरणात जामिनावर सुटका झालेले छगन भुजबळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना कृषी कायदे रद्द करण्याचा सल्ला देत आहेत…असं म्हणत भातखळकर यांनी भुजबळ यांना टोमणा मारला आहे.
महत्वाच्या बातम्या
- गृहमंत्री अनिल देशमुखांसोबत अट्टल गुन्हेगारांचे फोटोसेशन
- “शुबमन गिल येत्या काळात जगातील सर्वोत्कृष्ट सलामी फलंदाजांच्या यादीत असेल”
- ‘देशविघातक वक्तव्य करणाऱ्या शरजिल उस्मानीला तात्काळ अटक करा’
- पुणेकरांची घोर निराशा करणारा मोदी सरकारचा अर्थसंकल्प – कॉंग्रेस
- आता मिळावा फक्त एका मिस्ड कॉलवर LPG गॅस सिलेंडर !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

