टीम महाराष्ट्र देशा : पुण्यातील यु ब्रॉडबॅन्डचे इंटरनेट वापरणारे ग्राहक सध्या थर्ड क्लास सेवेमुळे त्रस्त आहेत. पुणे शहरातील काही भागांमधील ग्राहक गेल्या अनेक दिवसांपासून खराब सेवेमुळे त्रस्त आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये सध्या नाराजी असल्याचं चित्र आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
पुणे शहरात यु ब्रॉडबॅन्ड ही कंपनी वायफाय इंटरनेट सेवा पुरवते. परंतू यु ब्रॉड बॅडच्या गेल्या काही दिवसांपासूनच्या खराब सेवेमुळे ग्राहक त्रस्त आहेत. यासंबंधी तक्रार केली असता समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. तसेच कोणत्याही कर्मचाऱ्याला समस्या सोडवण्यासाठी पाठवले जात नाही. तसेच ग्राहकांना फक्त आश्वासने दिले जातात परंतू ती पाळली जात नाहीत.
यु ब्रॉडबॅन्डची सेवा ही गेल्या ४ दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे इंटरनेट सेवा ठप्प आहे. विशेषकरून अॉनलाईन कामे करणाऱ्या ग्राहकांना याचा विशेष फटका बसला आहे. यापूर्वीही यु ब्रॉड बॅडची सेवा काही खास नव्हती. वारंवार इंटरनेट स्पीड कमी असायचे. परंतू वारंवार तक्रार करूनही अद्याप यावर कोणताही तोडगा काढण्यात आला नाही.
दरम्यान, यु ब्रॉडबॅन्डच्या या खराब सेवेमुळे ग्राहक आता पर्यायी सेवांच्या शोधात असलेले पाहायला मिळत आहे. यात जिओ ही कंपनी आघाडीवर असलेली दिसत आहे. कारण जिओने ‘जिओ गिगा फायबर ही सेवा आणली आहे. त्यामुळे यु ब्रॉडबॅन्ड ही सेवा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे.
- मी राष्ट्रवादीशी एकनिष्ठ, वैरागचे मकरंद निंबाळकर आ. सोपलांना आव्हान देण्यास तयार
- ‘जन आशीर्वाद यात्रे’ला पुन्हा सुरवात, यात्रेच्या समारोप सभेला पंतप्रधान मोदी उपस्थितीत राहण्याची शक्यता
- मी बाळासाहेबांकडे परत गेलो असतो तर उद्धव घर सोडणार होते : नारायण राणे
- सत्ता आल्यावर सत्ताधाऱ्यांना पळता भूई थोडी करू : धनंजय मुंडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
