Share

‘कोळशाचे १४०० कोटी थकवले म्हणून ओरडत आहात, जीएसटीच्या ३५ हजार कोटींचे काय?’, पवारांचा केंद्राला सवाल

Published On: 

🕒 1 min read

पिंपरी चिंचवड : केंद्राची राज्य सरकारकडे कोळशाची तीन हजार कोटींची थकबाकी राहिली आहे. मात्र, बाकी असली म्हणून केंद्राने राज्याची कोणतीही अडवणूक केली नाही. राज्य सरकारचे ढिसाळ नियोजन आणि बाहेरून वीज खरेदी करून नफेखोरी करण्याचा उद्देश यामुळे राज्यात कोळशाची टंचाई जाणवत असल्याचा खळबळजनक आरोप केंद्रीय कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला.

यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पिंपरी चिंचवड येथे पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे. ‘महाराष्ट्राकडून कोळशाची किंमत द्यायला १० ते १२ दिवस उशीर झाला. म्हणून केंद्राचे मंत्री महाराष्ट्र सरकारवर आरोप करतात. पण दुसऱ्याबाजूला महाराष्ट्रातून केंद्राने जीएसटीची ३५ हजार कोटीची रक्कम वसुल केली. ते ३५ हजार कोटीचं येणं बाकी आहे. ते काही महिन्यांपासून दिलेलं नाही. एकाबाजूला ३५ हजार कोटींची महाराष्ट्राची रक्कम थकवली आहे. महाराष्ट्र सरकारवर असं दोषारोप करणं योग्य नाही’ असं शरद पवार म्हणाले.

‘महाराष्ट्राचा विद्यूत पुरवठा हा तीन प्रकारचा आहे. एक कोळशापासून वीज निर्मिती, दुसरं धरणामधील पाण्यापासून वीज निर्मिती आणि तिसरा औष्णिक वीज जी महाराष्ट्रात तारापूर किंवा काही ठिकाणी तयार होते. आज वीजेचे दर हे कमी करण्यसाठी काही काळजी घेतली पाहिजे ही भूमिका राज्य सरकारने घेतली. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काम, कोळशाच्या किंमती कमी करण्याच्या संबंधीचा आग्रह आपण धरला आहे.’

‘परंतू, आजच मी केंद्र सरकारचे त्या संबंधित खात्याचे मंत्री यांच्याशी चर्चा केली व त्यांनी सांगितलं, की महाराष्ट्र सरकारकडून तीन हजार कोटी रुपयांची कोळसा पुरवठ्याच्या रक्कमेची थकबाकी आलेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारला अडचणींना तोंड द्याव लागत आहे. मी माहिती घेतली, तीन हजार कोटींचं देणं आहे हे खरं आहे. त्यातील १४०० कोटी द्यायची व्यवस्था काल मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांनी केलेली आहे. ही रक्कम आज उद्या जाईल अशी माहिती पवार यांनी दिली.

‘एकाबाजुने ३५ हजार कोटी ही महाराष्ट्राची रक्कम आपण थकवायची आणि कोळशाच्या रक्कमेबद्दल आठ ते दहा दिवसांत देतो असं सांगूनही महाराष्ट्र सरकारवर दोषारोप करायचा, ही गोष्ट काही योग्य नाही. आणि हे दुर्दैवाने आज या ठिकाणी घडतयं’ असे देखील शरद पवार यांनी  सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!