लखनौ : भारतात कोरोनाव्हायरसमुळे परिस्थिती अधिकच गंभीर होत आहे आणि नवीन कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहेत. बुधवारी, देशभरात 1.85 लाख नवीन रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. तर 1025 जणांचा मृत्यू झाला. तसेच यापूर्वी मंगळवारी (13 एप्रिल) 1.61 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार गेल्या 24 तासात 1 लाख 85 हजार 248 लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे, तर या काळात 1025 लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर, भारतात कोरोनाची लागण होणारी संख्या 1 कोटी 38 लाख 70 हजार 731 वर गेली आहे आणि 1 लाख 72 हजार 114 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कोरोनाच्या या विळख्यात अनेक दिग्गज नेते देखील अडकत आहेत. आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देखील करोनाची लागण झाली आहे. योगी आदित्यनाथ यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आपण सध्या विलगीकरणात असल्याची माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. आजच समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. उत्तर प्रदेशात एकाच दिवशी दोन मोठ्या नेत्यांना करोनाची लागण झाली आहे.
शुरुआती लक्षण दिखने पर मैंने कोविड की जांच कराई और मेरी रिपोर्ट पॉजिटिव आई है।
मैं सेल्फ आइसोलेशन में हूं और चिकित्सकों के परामर्श का पूर्णतः पालन कर रहा हूं। सभी कार्य वर्चुअली संपादित कर रहा हूं।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) April 14, 2021
प्रदेश सरकार की सभी गतिविधियां सामान्य रूप से संचालित हो रही हैं।
इस बीच जो लोग भी मेरे संपर्क में आएं हैं वह अपनी जांच अवश्य करा लें और एहतियात बरतें।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) April 14, 2021
‘प्राथमिक लक्षणं दिसल्यानंतर मी करोना चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी सध्या विलगीकरणात आहे आणि डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचं पूर्णपणे पालन करत आहे’. योगी आदित्यनाथ यांनी यावेळी व्हर्च्युअल माध्यमातून आपण सर्व कामं करत असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पोलिसांची बांधिलकी जनतेशी असावी ना की सत्ताधाऱ्यांशी,’ मेहबूब शेख प्रकरणावरून चित्रा वाघ कडाडल्या
- धक्कादायक! मोबाईलवर गेम दाखवण्याच्या आमिषाने दोन बालकांवर अत्याचार
- केकेआरच्या पराभवानंतर शाहरुखने व्यक्त नाराजी; चाहत्यांची मागीतली माफी
- देशात लागणार संपूर्ण लॉकडाऊन ?, निर्मला सीतारामन यांचे मोठे विधान
- पावसाळी वातावरणामुळे शेतकऱ्यांसह वीट उत्पादकही चिंतेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

