चेन्नई : मगंळवारी चेन्नई येथे झालेल्या आयपीएलच्या अंत्यत चुरशीच्या सामन्यात रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने विजयाची गुढी उभारत कोलकाता नाइट रायडर्सचा १० धावांनी पराभव केला आहे. या विजयासोबत मुंबईने या मोसमातील आपल्या पहिल्याच विजयाची नोंद केली आहे. तसेच कोलकाताविरुद्ध विजयाची पंरपरा कायम ठेवली आहे.
केकेआरच्या सलामीवीरानी सामन्यात चांगली सुरुवात करुनही मधल्या फळीतील फलंदजाच्या अपयशामुळे केकेआरला दहा धावांनी पराभव स्विकारावा लागला. या पराभवानंतर कोलकाता नाइट रायडर्स संघाचा मालक अभिनेता शाहरुख खानने ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. ट्विट मध्ये त्याने लिहीले आहे. ‘अतिशय निराशाजनक कामगीरी, थोडक्यात बोलायचे तर मी केकेआरच्या सर्व चाहत्यांची माफी मागतो.’
Disappointing performance. to say the least @KKRiders apologies to all the fans!
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 13, 2021
शाहरुख व्यतिरीक्त केकेआरच्या संघाचा खेळाडू फिरकीपटू हरभजन सिंगनेही ‘निराशाजनक’ असे ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. केकेआरने सलामीच्या सामन्यात हैदराबादचा पराभव केला होता. मात्र मुंबई विरुद्ध त्यांना पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे पुढच्या सामन्यात चांगली कामगिरी करून शाहरुखची नाराजी दुर करतील, अशी अपेक्षा आहे. कोलकाताचा पुढील सामना १८ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘हारी हुई बाजी जितना हमे आती है’ हिटमॅन रोहित शर्माची विजयानंतर प्रतिक्रिया
- धक्कादायक! कोरोनाच्या संकटात महिला तस्करी, बालविवाह वाढले
- कोरोनामुळे सलग दुसर्या वर्षी पाडव्याला परभणीमध्ये सराफा खरेदी – विक्री ठप्प
- ‘या’ लोकांना कोरोनामुळे मृत्यूचा धोका जास्त तज्ज्ञांचा इशारा
- लग्न समारंभासाठी राज्यात नवे निर्बंध; आता 25 जणांच्या उपस्थितीत लग्न उरकावं लागणार


