Share

देशात लागणार संपूर्ण लॉकडाऊन ?, निर्मला सीतारामन यांचे मोठे विधान

Published On: 

नवी दिल्ली : भारतात कोरोनाव्हायरसमुळे परिस्थिती अधिकच गंभीर होत आहे आणि नवीन कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहेत. बुधवारी, देशभरात 1.85 लाख नवीन रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. तर 1025 जणांचा मृत्यू झाला. तसेच यापूर्वी मंगळवारी (13 एप्रिल) 1.61 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार गेल्या 24 तासात 1 लाख 85 हजार 248 लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे, तर या काळात 1025 लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर, भारतात कोरोनाची लागण होणारी संख्या 1 कोटी 38 लाख 70 हजार 731 वर गेली आहे आणि 1 लाख 72 हजार 114 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

आता देशभरात कोरोनाचे दीड लाखांहून अधिक रुग्ण सापडत असल्याने देशपातळीवर लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लॉकडाऊनबाबत सूचक संकेत दिले आहेत. ‘देशात कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाट वेगाने पसरत असली तरी व्यापक पातळीवर लॉकडाऊन लावण्याची केंद्र सरकारची कुठलीही योजना नाही आहे. आम्हाला अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प करायची नाही आहे. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे आता संपूर्ण देश लॉक होणार नाही. तर कोरोनाच्या साथीला रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर नियंत्रणासाठी विशेष पावले उचलली जातील. कोरोना रुग्णांच्या कुटुंबीयांना वेगळे ठेवण्याबाबत उपाय केले जातील. स्थानिक पातळीवरील उपायांमधून संकटाचा सामना केला जाईल. मात्र लॉकडाऊन लावले जाणार नाही’. असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे.

अर्थ मंत्रालयाने याबाबत ट्विट करत कोरोना विषाणूच्या साथीला रोखण्यासाठी पाच सुत्री रणनीती तपासणी, माहिती घेणे, उपचार करणे, लसीकरण आणि कोविड-१९ पसरण्यापासून रोखण्यासाठी देशात सुरू असलेल्या माहितीचे विवरण प्रसिद्ध केले आहे. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री आठ वाजता जनतेला संबोधित करताना बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून १५ दिवसांच्या कठोर निर्बंधांची घोषणा केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!